शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

ब्लाटर पाचव्यांदा अध्यक्षपदी

By admin | Updated: May 30, 2015 01:46 IST

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदी सॅप ब्लाटर यांची पाचव्यांदा निवड झाली आहे. जॉर्डनचे प्रिन्स अली बिन अल हुसेन यांनी दुसऱ्या फेरीपूर्वी माघार घेतली.

फिफा निवडणूक : जॉर्डनच्या प्रिन्स अली बिन यांची दुसऱ्या फेरीपूर्वी माघारझुरिच : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदी सॅप ब्लाटर यांची पाचव्यांदा निवड झाली आहे. जॉर्डनचे प्रिन्स अली बिन अल हुसेन यांनी दुसऱ्या फेरीपूर्वी माघार घेतली. स्वित्झर्लंडमधील झुरिच शहरात झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. गेल्या दोन दिवसांपासून भ्रष्टाचार आणि लाचखोरी प्रकरणात फिफा गाजत होती. आज (शुक्रवारी) झालेल्या निवडणुकीत पहिल्या फेरीत ब्लाटर यांना १३३ तर प्रिन्स अली यांना ७३ मते पडली. ७९ वर्षीय ब्लाटर यांना पूर्ण बहुमतासाठी पहिल्या फेरीत १४० मतांची आवश्यकता होती. पण ही त्यांची संख्या पूर्ण न झाल्याने दुसरी फेरी होणार हे नक्की झाले होते. पण दुसरी फेरी सुरू होण्यापूर्वीच प्रिन्स अली यांनी माघार घेतली आणि ब्लाटर हे पाचव्यांदा जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या क्रीडा संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान झाले. या निवडणुकीमध्ये आफ्रिका विभागाचे ५४, युरोप विभागाचे ५३, एशिया विभागाचे ४६, नॉर्थ व सेंट्रल अमेरिकचे ३५, ओसेनियाचे ११ व साऊथ अमेरिकेचे १० असे एकूण २०९ मते होती. मतदान सुरू होण्यापूर्वी युरोपीयन देशांनी आपली ५३ मते तर आॅस्ट्रेलियाने आपले मत प्रिन्स अली यांना देणार असल्याचे जाहीर केले होते. तर दुसरीकडे आफ्रिकन आणि एशियन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्ही ब्लाटर यांना मतदान करणार असे सांगितले होते. याचबरोबर न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिका या दिग्गज देशांनी सुद्धा ब्लाटरविरोधात मतदान करणार असल्याची घोषणा केली होती. (वृत्तसंस्था)