शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

महाराष्ट्राच्या कन्येचं मोठं स्वप्न; मैदानावरच नाही तर नौदलात भरती होऊन करायचीय देशसेवा!

By स्वदेश घाणेकर | Published: January 21, 2020 12:25 PM

गुवाहाटी येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया २०२० युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. 

गुवाहाटी येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया २०२० युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत पदक जिंकताना महाराष्ट्राचा प्रत्येक खेळाडू नवी स्वप्नं घेऊन स्वगृही परतला आहे. अनेकांना या यशानंतर आंतरराष्ट्रीय स्थरावर अजून घवघवीत यश मिळवण्याची ऊर्जा मिळाली आहे, तसा निर्धारही अनेकांनी बोलून दाखवला आहे. यापैकी एक अशी खेळाडू आहे जिने आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवण्याबरोबर देशासाठी सैन्यात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे. 

महाराष्ट्राची पूर्णा रावराणे असे या खेळाडूचे नाव आहे. पूर्णाने २१ वर्षांखालील मुलींच्या गटात गोळाफेकीत सुवर्णपदक मिळविताना स्पर्धा विक्रम नोंदवला. तिने १४.५७ मीटर्सपर्यंत गोळाफेक करीत अनामिका दासने गतवर्षी नोंदविलेला १४.१० मीटर्स हा विक्रम मोडला. या विक्रमी कामगिरीनंतर 'लोकमत'ने तिच्याशी संवाद साधला. त्यावेळी तिच्या प्रवासाचा एकेक पैलू उलगडला. 

खेलो इंडियात सुवर्णपदक जिंकण्यासाठी पूर्णाला पाचव्या प्रयत्नाची प्रतीक्षा करावी लागली. पाचव्या प्रयत्नात पूर्णाने सर्वोत्तम कामगिरी केली. पूर्णा मूळची सिंधुदुर्गातील वैभववाडी येथील रहिवासी असून, सध्या ती मालाड येथे हिरेन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. गतवर्षी तिला रौप्यपदक मिळाले होते. तिचे वडील सुबोध हे मुष्टियोद्धे असून तिची बहीण कस्तुरी ही अडथळा शर्यतीतील खेळाडू आहे. त्यामुळे खेळाची आवड तिला लहानपणीच लागली. 

मागील महिन्यात पूर्णाने ऑल इंडिया स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. दहिसर येथील VPM येथे ती सराव करते. तिने सांगितले की," घरातच खेळाडू असल्याने मीही खेळाडू बनले. माझे वडील राष्ट्रीय बॉक्सर आहेत, तर बहीण राष्ट्रीय अडथळा शर्यतीतीत धावपटू आहे. तिच्यामुळे मी या खेळाकडे वळली. मला पहिलं पदक हे गोळाफेकीत मिळालं होतं तेही वयाच्या दहाव्या वर्षी." 

Motivator ताई...या क्रीडा प्रकाराला अजून हवी तशी प्रसिद्धी मिळत नाही. याचं दु:ख पूर्णाला कधी वाटलं नाही. आपण आपल्या खेळाचा स्तर एवढा उंचावायचा की प्रसिद्धी स्वतः तुमच्याकडे येईल, असा निर्धार पूर्णाने बोलून दाखवला. "मला सर्वात जास्त कोणाकडून प्रेरणा मिळत असेल तर ती मोठ्या बहिणीकडून मिळते. ती मला नेहमी सांगते की पराभवही एन्जॉय करता आला पाहिजे. तेव्हाच यशाचं खरं महत्त्व समजते. तिची ही वाक्यं मला प्रेरणा देत राहतात. एक लक्ष्य मिळवल्यानंतर पुढील लक्ष्य निश्चित कर, हे ती मला सतत सांगते. स्वतःच्या कामगिरीवर बंधनं घालून घेऊ नकोस, हा तिनं शिकवलेला सिंपलफंडा आहे," असे पूर्णाने सांगितले. 

वडील गुरू अन् आई डायटिशन... पूर्णा सध्यी भारतीय क्रमवारीत टॉप टेनमध्ये आहे. त्यामुळे त्यात टॉप टूमध्ये येण्याचं तिचं स्वप्न आहे. "हा क्रीडा प्रकार खूप तांत्रिक आहे आणि ते कधी कधी समजून घेण्यात अडचण होते. पण पप्पा सोप्या भाषेत ते समजावून सांगतात. त्यामुळे खूप फायदा होतो. आई माझ्या जेवणाच्या पथ्यावर बारकाईने लक्ष ठेवून असते. ती माझी डायटिशन आहे," असे पूर्णाने सांगितले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशासाठी पदक जिंकण्याबरोबर भारतीय नौदलात दाखल होण्याचं पूर्णाचं स्वप्न आहे. तिच्या या स्वप्नांना 'लोकमत'कडून शुभेच्छा... 

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र