शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

भुवनेश्वरने डोळे दिपवले

By admin | Updated: July 21, 2014 01:56 IST

दुसऱ्या कसोटीचा आणि मालिकेचा निकाल काहीही लागो; पण एका खेळाडूने सर्वांची मने जिंकली आहेत, तो म्हणजे भुवनेश्वर कुमार.

अजय नायडू, लंडनदुसऱ्या कसोटीचा आणि मालिकेचा निकाल काहीही लागो; पण एका खेळाडूने सर्वांची मने जिंकली आहेत, तो म्हणजे भुवनेश्वर कुमार. बॅट आणि बॉल या दोन्ही ठिकाणी त्याने सरस कामगिरी केली आहे. २४ वर्षीय भुवनेश्वरने चार ेडावांत तीन अर्धशतके केली आहेत. केवळ अर्धशतके म्हणून या धावा महत्त्वाच्या नाहीत, तर अतिशय दबावाच्या परिस्थितीत डावाचा नूर पालटणाऱ्या भागीदाऱ्या करताना त्याने ही अर्धशतके केली आहेत, म्हणून त्यांना अतिशय महत्त्व आहे. आज, रविवारी त्याने रवींद्र जडेजाबरोबर ९९ धावांची भागीदारी करून भारताला या सामन्यात ड्रायव्हिंग सीटवर नेऊन बसविले. भारताने कसोटी जिंकली तर त्याचे अर्धेअधिक श्रेय भुवनेश्वरकुमारला निर्विवादपणे द्यावे लागेल. भुवीने त्याच्या चार डावात ५८, ६३*, ३६ आणि ५२ अशा धावा केल्या आहेत. यात त्याने चारही वेळा महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या केल्या आहेत. नॉटिंगहॅम कसोटीत पहिल्या डावात त्याने मोहम्मद शमीबरोबर १११ धावांची भागीदारी केली. दुसऱ्या डावात तो स्टुअर्ट बिन्नीबरोबर उभा राहिला आणि कसोटी अनिर्णित केली. लॉर्डस कसोटीच्या पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणेने शतकाचा कळस चढविला. त्याचा पाया भुवनेश्वरकुमार बनला होता. या चार डावांत त्याने एक शतकी आणि तीन नव्वदीच्या भागीदाऱ्या केल्या. म्हणून तर त्याची बॅटिंग बघून वासीम आक्रमला तो भारताचा अष्टपैलू खेळाडू असल्याचे वाटते. स्विंग आणि सिम हे त्याचे अस्त्र आहे. त्याचसाठी त्याला संघात घेण्यात आले आहे. त्या भूमिकेला त्याने न्यायही दिला आहे. लॉर्डसवर त्याने डावात सहा बळी घेतले. त्याचा आयडॉल असलेला प्रवीणकुमार आणि त्याचा रणजी सहकारी आर. पी सिंग यांच्या यादीत आपले नाव बघून भुवनेश्वर कुमारला अभिमान वाटतो आहे. फलंदाजीत यश मिळाल्याने गोलंदाजीसाठी आत्मविश्वास वाढला असे तो सांगतो. प्रवीणकुमारने दिलेल्या टिप्स अतिशय उपयुक्त ठरल्याचेही त्याने सांगितले.