शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

भक्ती कुलकर्णीने रोवला मानाचा तुरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 21:11 IST

जयपूर येथील स्पर्धेत राष्ट्रीय चॅम्पियन

ठळक मुद्दे महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णी हिने जयपूर येथे झालेली राष्ट्रीय महिला बुद्धिबळ चॅम्पियनशीप जिंकलीआशियाई स्पर्धेत करणार भारताचे  प्रतिनिधीत्वआशियाई आणि विश्व महिला चॅम्पियशीप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली.

पणजी : गोव्याची पहिली महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णी हिने जयपूर येथे झालेली राष्ट्रीय महिला बुद्धिबळ चॅम्पियनशीप जिंकली. याबरोबरच तिने पुढील आशियाई आणि विश्व महिला चॅम्पियशीप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी साधली. यापूर्वी सुद्धा राष्ट्रीय चॅम्पियनशीप जिंकण्याचा मान तिने पटकाविला होता. त्यामुळे आपल्या शानदार यशाच्या बळावर भक्तीने शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे. उल्लेखनीय म्हणजे, ज्युनियर गटात तिने राष्ट्रीय स्पर्धेचा चषक बºयाचदा पटकाविला आहे. आता वरिष्ठ गटातही तिने गोव्यासाठी चषक पटकाविला आहे. आता ज्युनियर आणि वरिष्ठ गटात राष्ट्रीय, आशियाई आणि राष्ट्रकूल चॅम्पियशीपमध्ये विजेतेपद पटकाविणारी ती पहिली महिला गोमंतकीय खेळाडू ठरली आहे. स्पर्धेत पेट्रोलियम बोर्डाच्या मेरी गोम्सकडून नवव्या फेरीत पराभूत झाल्यानंतर भक्ती पुनरागमन करेल, असे वाटत नव्हते. मात्र, प्रयत्नांची पराकाष्टा करीत तिने मुसंडी मारली आणि स्पर्धेच्या चषकावर नाव कोरले. दहाव्या फेरीत भक्तीने मिशेल कॅथरिनाचा पराभव तर अंतिम फेरीत तामिळनाडूच्या सरन्या जे हिला बरोबरीवर रोखले.मेरी गोम्स आणि भक्ती या दोघी प्रत्येकी ८.५ गुणांवर राहिल्या. चषक पटकाविल्यानंतर भक्तीने आपल्या यशाचे श्रेय तिचे प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रघुनंदन गोखले आणि पालकांना दिले. भक्तीच्या यशाचे कौतुक अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे महासचिव भारत सिंह चौहान यांनी केले. गोव्यातील एक आघाडीची बुद्धिबळपटू म्हणून भक्तीचा उल्लेख करणे गरजेचे आहे. ती ज्या पद्धतीने योगदान देत आहे, निश्चितच तिचे भविष्य उज्ज्वल आहे, असे चौहान म्हणाले. भक्तीने गोवा कार्बन लिमिटेडचे श्रीनिवास धेंपो, गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नीलेश काब्राल आणि सचिव किशोर बांदेकर यांचेही आभार व्यक्त केले. किशोर बांदेकर यांनी भक्तीचे कौतुक करताना म्हटले की, तिने दुसºयांदा राष्ट्रीय महिला स्पर्धा जिंकली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिने गोव्याचे नाव उज्ज्वल केले आहे. भविष्यात तिच्याकडून अशीच अपेक्षा आहे. गोव्याच्या बुद्धिबळ क्षेत्रासाठी तिचे यश अभिमानास्पद आहे. दरम्यान, पुढील महिन्यात युनायटेड अरब अमिरात चेस फेडरेशनने आयोजित केलेल्या शारजाह चषक महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी भक्तीला आमंत्रित करण्यात आले आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णआशियाई महिला चॅम्पियनशीप (२००६, उजबेकिस्तान)राष्ट्रकूल महिला स्पर्धा (२०१४, स्कॉटलँड)विश्व शालेय मुलींची स्पर्धा (२००८, सिंगापूर)आशियाई ज्युनियर मुलींची स्पर्धा (२०११, श्रीलंका)राष्ट्रकूल ज्युनियर मुलींची स्पर्धा (२०१२, चेन्नई)१८ वर्षांखालील आशियाई स्पर्धा (२०१०, चीन)१४ वर्षांखालील मुलींची आशियाई स्पर्धा (२००६, इराण)१६ वर्षांखालील राष्ट्रकूल (२००६, मुंबई)

राष्ट्रीय स्तरावर कामगिरीदोन वेळा राष्ट्रीय ज्युनियर मुलींच्या स्पर्धेचा चषक (२००७,२००९)दोन वेळा राष्ट्रीय महिला चॅलेंजर स्पर्धा (२०११, २०१७)दोन वेळा राष्ट्रीय प्रीमियर उपविजेतेपद (२०१२, २०१७)राष्ट्रीय महिला बुद्धिबळ स्पर्धा (२०१८-१९)

टॅग्स :Chessबुद्धीबळgoaगोवा