शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

बेलची शतकी खेळी

By admin | Updated: July 29, 2014 06:00 IST

कसोटी कारकीर्दीत ७ हजार धावांचा टप्पा गाठला. चहापानाला खेळ थांबला त्यावेळी १३३ धावांवर नाबाद असेलल्या बेलला पदार्पणाची कसोटी खेळणारा जोस बटलर (१३) साथ देत होता.

साउथम्पटन : इयान बेलने झळकाविलेल्या कारकीर्दीतील २१ व्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने सोमवारी दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत पहिल्या डावात ५ बाद ४५२ धावांची मजल मारली. बेलने जडेजाच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत शतक पूर्ण केले. त्याने त्याचवेळी कसोटी कारकीर्दीत ७ हजार धावांचा टप्पा गाठला. चहापानाला खेळ थांबला त्यावेळी १३३ धावांवर नाबाद असेलल्या बेलला पदार्पणाची कसोटी खेळणारा जोस बटलर (१३) साथ देत होता. भारताने दुसऱ्या सत्रात जो रुट (३) आणि मोईन अली (१२) यांना माघारी परतवण्यात यश मिळविले. भारतातर्फे भुवनेश्वर कुमार (२-९३) सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने उपाहारानंतर आज गोलंदाजांना मोठे स्पेल करण्याची संधी दिली नाही. मोहम्मद शमी (१-१०४), पंकज सिंग (०-११२) आणि भुवनेश्वर कुमार यांना एकापाठोपाठ गोलंदाजीसाठी पाचारण केले. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडच्या धावगतीवर अंकुश राखण्यात यश आले. त्यात जो रुट व मोईन अली यांना भुवनेश्वरने तंबूचा मार्ग दाखविला. भारतीय गोलंदाजांची निराशाजनक कामगिरी दुसऱ्या दिवशीही कायम होती. शतकवीर गॅरी बॅलन्स व इयान बेल यांनी चमकदार फलंदाजी करीत इंग्लंडला उपाहारापर्यंत ३ बाद ३५८ धावांची मजल मारुन दिली. कामचलावू फिरकीपटू रोहित शर्माला नशिबाची साथ लाभली. त्याने बॅलेन्सला (१५६) यष्टिपाठी झेल देण्यास भाग पाडले, पण पंचाच्या निर्णयाबाबत साशंकता होती. भारतीय गोलंदाजांना एजिस बाउलच्या पाटा खेळपट्टीवर इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजविण्यात अपयश आले. उपाहाराला खेळ थांबला त्यावेळी बेल ६८ तर जोर रुट २ धावांवर खेळपट्टीवर होते. बेल व बॅलन्सने तिसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी केली. इंग्लंडने उपाहारापर्यंत २९ षटकांत १११ धावा वसूल केल्या. इंग्लंडने कालच्या २ बाद २४७ धावसंख्येवरुन पुढे खेळताना बॅलन्स व बेल यांनी सावधगिरी बाळगत फलंदाजी केली. धावफलकइंग्लंड पहिला डाव :- अ‍ॅलिस्टर कुक झे. धोनी गो. जडेजा ९५, सॅम रोबसन झे. जडेजा गो. शमी २६, गॅरी बॅलन्स झे. धोनी गो. शर्मा १५६, इयान बेल खेळत आहे १३३, जो रुट झे. धोनी गो. भुवनेश्वर ०३, मोईन अली झे. रहाणे गो. भुवनेश्वर १२, जोस बटलर खेळत आहे १३. अवांतर (१४). एकूण १४५ षटकांत ५ बाद ४५२. बाद क्रम : १-५५, २-२१३, ३-३५५, ४-३७८, ५-४२०. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ३४-१०-९३-२, मोहम्मद शमी ३०-४-१०४-१, पंकज सिंग ३४-८-११२-०, रोहित शर्मा ९-०-२६-१, रविंद्र जडेजा ३६-९-१०१-१, शिखर धवन २-०-४-०.