जयवर्धने, आमलाकडे पाठ
By Admin | Updated: February 17, 2015 00:42 IST2015-02-17T00:42:09+5:302015-02-17T00:42:09+5:30
यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १० कोटी ५० लाख रुपयांत, तर दिल्ली डेअर डेव्हिल्सने श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्युजला सात कोटी रुपयांत खरेदी केले.

जयवर्धने, आमलाकडे पाठ
आयपीएल लिलाव : सिंधुदुर्गचा निखिल नाईक पंजाब संघात
बंगळुरू : स्पॉट फिक्सींग आणि सट्टेबाजी यामुळे बदनाम झालेल्या आयपीएल-८च्या मोसमासाठी खेळाडूंच्या लिलावात युवराजसिंग नंतर यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १० कोटी ५० लाख रुपयांत, तर दिल्ली डेअर डेव्हिल्सने श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्युजला सात कोटी रुपयांत खरेदी केले.
न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्टला सनरायझर्स हैदराबादने ३ कोटी ८० लाखांत, भारताचा फिरकीपटू अमित मिश्रा याला दिल्लीने ३ कोटी ५० लाखांत, आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर अॅरॉन फिंचला मुंबई इंडियन्सने ३ कोटी २० लाखांत खरेदी केले. श्रीलंकेचा माहेला जयवर्धने, कुमार संगकारा आणि तिलकरत्ने दिलशान, दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि न्यूझीलंडचा रॉस टेलर यांना कोणत्याही संघाने घेणे टाळले.
दिल्लीकडे इतर संघांच्या तुलनेत सर्वाधिक ३९.७५ कोटी रुपये होते. बंगळुरूने कार्तिकला गतवर्षीच्या तुलनेत पाच कोटी कमी रक्कम देऊन खरेदी केले, तर सनरायझर्सने केवीन पीटरसनला दोन कोटींमध्ये विकत घेतले. गतवर्षी त्याला नऊ कोटी रुपये मिळाले होते. भारताचा सलामीवीर मुरली विजय याच्यासाठी पंजाबने ३ कोटी मोजले, इंग्लंडचा वन डे कर्णधार इयान मॉर्गनसाठी हैदराबादने दीड कोटी मोजले, तर न्यूझीलंडच्या केन विलियम्सनसाठी हैदराबाने ६० लाखच मोजणे पसंत केले.
(वृत्तसंस्था)
खरेदी केलेले काही खेळाडू
मुरली विजय- किंग्ज इलेव्हन पंजाब (३ कोटी), अँजेलो मॅथ्युज - दिल्ली डेअर डेव्हिल्स (७.५ कोटी), केन विलियम्सन - सनरायझर्स हैदराबाद (६० लाख), युवराज सिंग - दिल्ली (१६ कोटी), केवीन पीटरसन - हैदराबाद (२ कोटी), दिनेश कार्तिक - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (१०.५ कोटी), अमित मिश्रा - दिल्ली (३.५ कोटी), अॅरॉन फिंच - मुंबई इंडियन्स (३.२ कोटी), इयान मॉर्गन - हैदराबाद (१.५ कोटी), एस. बद्रिनाथ - बंगळुरू (३० लाख), मायकल हस्सी - चेन्नई सुपर किंग्ज (१.५ कोटी), जेम्स निशाम - कोलकाता नाईट रायडर्स (५० लाख), रवी बोपारा - हैदराबाद (१ कोटी), क्रिस मोरिस - राजस्थान रॉयल्स (१.४ कोटी), डॅरेन सॅमी - बंगळुरू (२.८ कोटी), लक्ष्मीरतन शुक्ला - हैदराबाद (३० लाख), प्रवीणकुमार - हैदराबाद (२.२ कोटी), ट्रेंट बोल्ट - हैदराबाद (३.८ कोटी), जयदेव उनाडकट - दिल्ली (१.१ कोटी), सीन अॅबोट - बंगळुरू (१ कोटी), अॅडम मिल्ने - बंगळुरू (७० लाख), प्रग्यान ओझा - मुंबई (५० लाख), ब्रॅड हॉज - कोलकाता (५० लाख), डेव्हिड वाएस - बंगळुरू (२.८ कोटी), मिचल मॅक्लेनहॅन - मुंबई (३० लाख), गुरिंदर संधू - दिल्ली (१.७ कोटी), श्रेयस अय्यर - दिल्ली (२.६ कोटी), सर्फराज खान - बंगळुरू (५० लाख), निखिल नाईक - पंजाब (३० लाख), आदित्य गरहवाल - कोलकाता (२५ लाख), डोमनिक जोसेफ - दिल्ली (७५ लाख), केसी चारिअप्पा - कोलकाता (२.४ कोटी), शेल्डन जॅक्सन - कोलकाता (१५ लाख), ट्रावीस हेड - दिल्ली (३० लाख), इरफान पठाण - चेन्नई (१.५ कोटी), अॅल्बी मॉर्केल - दिल्ली (३० लाख), सिद्धेश लाड - मुंबई (१० लाख), जे. सुचिथ - मुंबई (१० लाख), झहीर खान - दिल्ली (४ कोटी), अभिमन्यू मिथून - मुंबई (३० लाख), अॅडन ब्लिझार्ड - मुंबई - ३० लाख.