शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘अझलन शाह’मध्ये भारताची कॅनडावर २ गोलने मात

By admin | Updated: April 10, 2015 08:38 IST

विजेतेपदाच्या शर्यतीतून आधीच बाद झालेल्या भारतीय संघाने आपल्यापेक्षा कमी रँकिंग असणाऱ्या कॅनडाला पराभूत करण्यासाठी चांगलीच

इपोह (मलेशिया) : विजेतेपदाच्या शर्यतीतून आधीच बाद झालेल्या भारतीय संघाने आपल्यापेक्षा कमी रँकिंग असणाऱ्या कॅनडाला पराभूत करण्यासाठी चांगलीच मेहनत घ्यावी लागली आणि आज येथे २४ व्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत त्यांचा ५-३ गोलने पराभव करीत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली.भारताकडून रूपिंदर पालसिंह (१३ वे मिनीट) आणि व्ही. आर. रघुनाथ (३२ वे मिनीट) यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल केले, तर रमणदीपसिंहने ४६ आणि ४७ व्या मिनिटाला मैदानी गोल केला. त्यानंतर सतबीरसिंहने ४९ व्या मिनिटाला आणखी एक गोल करीत भारताच्या गोलची संख्या पाचवर पोहोचवली.जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असणाऱ्या कॅनडाकडून ओलिव्हर शोलफिल्डने ४३ व्या, जगदीश गिलने ४९ व्या आणि डेव्हिड जेम्सन याने ५२ व्या मिनिटाला गोल केले. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱ्या भारताने चेंडूवर चांगले नियंत्रण ठेवले; परंतु त्यांची कामगिरी तेवढी प्रभावी नव्हती.नेहमीप्रमाणे याही सामन्यात भारतीय खेळाडूंनी अनेकदा गोल करण्याची संधी दवडली आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला गोल करणे सोपे गेले. कॅनडाने ४३ व्या मिनिटाला वेगवान रिव्हर्स हिटने गोल करताना भारतीय संघाला धक्का दिला. त्याचे भारतीय गोलरक्षक श्रीजेश रवींद्रनजवळ उत्तर नव्हते.सामन्याच्या ४९ व्या मिनिटाला गिलने पेनल्टी कॉर्नरवर कॅनडासाठी दुसरा गोल केला, तर जेम्सनने ५२ व्या मिनिटाला कॅनडासाठी तिसरा गोल केला. भारत आता शनिवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध या स्पर्धेतील सर्वांत कठीण लढत खेळेल. भारताने चार लढतीत एक विजय, एक ड्रॉसह चार गुण मिळवले. त्यामुळे हा संघ रविवारी होणाऱ्या फायनलच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. (वृत्तसंस्था)