शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन ओपन : महिला फायनल मध्ये जिंकणाऱ्या विजेत्याला मिळणार तब्बल 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:55 IST

Australian Open 2025 Price Money : ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत आज सबालेन्का विरूद्ध कीज अशी स्पर्धा रंगणार आहे

Australian Open 2025 Price Money : ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ ची महिला एकेरीमधील अंतिम फेरी शनिवारी म्हणजेच आज रंगणार आहे. महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली आर्यना सबालेन्का आणि मॅडिसन कीज यांच्यात विजेतेपदाची लढत होणार आहे. सबालेन्का सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर कीज तिची दुसरी ग्रँड स्लॅम फायनल खेळणार आहे. शनिवारी अंतिम फेरीत दोन्ही खेळाडू आमनेसामने येतील, तेव्हा विजेतेपदासाठी दोघीही प्राण पणाला लावतील यात शंका नाही. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या विजेत्याला कोट्यवधींचे बक्षीस मिळणार आहे.

सबालेन्का इतिहास रचेल?

सबालेन्का आणि कीज यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. सबालेन्काने उपांत्य फेरीच्या सामन्यात पाउला बडोसाचा ६-४, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. सबालेन्काने २०२३ आणि २०२४ चे ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले. आता तिने पुन्हा एकदा विजेतेपद पटकावल्यास सलग तीन ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी सबालेन्का २१व्या शतकातील पहिली खेळाडू बनेल. तिच्याआधी गेल्या शतकात मार्गारेट कोर्ट स्मिथ, इव्हाना गूलागॉन्ग, स्टेफी ग्राफ आणि मोनिका सेलेस यांनी हा पराक्रम केला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या मॅडिसन कीजने उपांत्य फेरीत पोलंडच्या इंगा स्विटेकचा ५-७, ६-१, ७-६ (८) असा जिंकून विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला.

विजेत्या महिला स्पर्धकाला किती कोटी मिळणार?

ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ च्या महिला एकेरीची अंतिम फेरी जी कोणीही खेळाडू जिंकेल, ती कोट्यवधींच्या बक्षीसाची मानकरी ठरेल. यावेळी अंतिम सामना जिंकल्यानंतर विजेत्याला ३५ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १९ कोटी रुपयांची बक्षीसाची रक्कम मिळणार आहे.

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपन