Aus Open 2022 Final: राफेल नदालची ऐतिहासिक कामगिरी, AUS ओपन जिंकून २१ व्या ग्रँडस्लॅमवर मोहर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 07:52 PM2022-01-30T19:52:02+5:302022-01-30T19:52:22+5:30

Aus Open 2022 Final: स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल यानं आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत ऑस्ट्रेलिन ओपन स्पर्धा जिंकून नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

australia open 2022 Nadal beats Medvedev to win record 21st Grand Slam title | Aus Open 2022 Final: राफेल नदालची ऐतिहासिक कामगिरी, AUS ओपन जिंकून २१ व्या ग्रँडस्लॅमवर मोहर!

Aus Open 2022 Final: राफेल नदालची ऐतिहासिक कामगिरी, AUS ओपन जिंकून २१ व्या ग्रँडस्लॅमवर मोहर!

Next

Aus Open 2022 Final: स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल यानं आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत ऑस्ट्रेलिन ओपन स्पर्धा जिंकून नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. नदालचं हे २१ वं ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरलं असून त्यानं नोवाक जोकोविच आणि रॉजर फेडरर यांना मागे टाकलं आहे. फेडरर आणि जोकोविचच्या नावावर आतापर्यंत २० ग्रँडस्लॅम विजेतेपदांची नोंद आहे. नदालनं आज रशियाच्या मेदवेदेव याचा पराभव केला. जवळपास सहा तास चाललेल्या रोमांचक लढतीत नदालनं अखेरच्या सेटमध्ये मेदवेदेवर विजय प्राप्त करत ऑस्ट्रेलियन ओपनवर आपलं नाव कोरलं. नदालनं मेदवेदेववर २-६, ६-७,६-४,६-४, ७-६ असा विजय प्राप्त केला.

अंतिम सामन्याच्या सुरुवातीच्या दोन सेटमध्ये रशियाच्या मेदवेदेवनं दमदार कामगिरी करत नदालवर वर्चस्व निर्माण केलं होतं. पण नंतरच्या दोन सेटमध्ये नदालनं पुनरागमन केलं आणि मेदवेदेवला धक्का दिला. मेदवेदेवनं सुरुवातीचे दोन सेट ६-२,७-६ अशा फरकानं स्वत:च्या नावावर केले होते. पण नदालनं पुन्हा एकदा आपल्या झुंजार खेळीचं दर्शन घडवत पुढचे दोन सेट ६-४,६-४ अशा फरकानं स्वत:च्या पारड्यात पाडले. यानंतर सामन्यात खरा रोमांच पाहायला मिळाला. 

मेदवेदेव vs नदाल
पहिला सेट निकाल: ६-२ (मेदवेदेव)
दुसरा सेट निकाल: ७-६ (मेदवेदेव)
तिसरा सेट निकाल: ६-४ (नदाल)
चौथा सेट निकाल: ६-४ (नदाल)
पाचवा सेट निकाल: ७-५ (नदाल)

Web Title: australia open 2022 Nadal beats Medvedev to win record 21st Grand Slam title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.