शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

११ ऑगस्ट अन् भारताच्या ऑलिम्पिक गोल्ड मेडलचं कनेक्शन; अभिनव बिंद्रा, भारतीय पुरुष हॉकी संघानं रचलाय इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 3:59 PM

११ ऑगस्ट २००८ -  याच दिवशी नेमबाज अभिनव बिंद्रानं इतिहास रचला होता. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं सुवर्णपदक जिंकले होते अन् ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता.

११ ऑगस्ट २००८ -  याच दिवशी नेमबाज अभिनव बिंद्रानं इतिहास रचला होता. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं सुवर्णपदक जिंकले होते अन् ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये हा सुवर्णक्षण पाहण्यासाठी भारतीयांना ७ ऑगस्ट २०२१ची वाट पाहावी लागली. भालाफेकपटू नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. आज सोशल मीडियावर देशाचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा ट्रेंड होत आहे. ११ ऑगस्ट अन् भारताचे ऑलिम्पिक गोल्ड मेडल कनेक्शन हे फक्त अभिनव बिंद्राच्या पदकापुरतेच नाही, तर फार जूने आहे..

चला जाणून घेऊया ११ ऑगस्ट अन् गोल्ड मेडल कनेक्शन...भारतान आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत १० सुवर्णपदकं जिंकली आहेत. यातील दोन पदकं ही ११ ऑगस्ट या तारखेला जिंकता आलेली आहेत. २००८मध्ये बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनवनं सुवर्णपदक जिंकले, त्याआधी १९३२मध्ये लॉस अँजिलिस येथे भारतीय पुरुष हॉकी संघानं मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचा २४-१ असा धुव्वा उडवून ऑलिम्पिकमधील सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले होते.

१९३२च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ध्यानचंद यांच्याकडे पहिल्यांदा भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. या स्पर्धेत फक्त तीन संग सहभागी झाले होते आणि भारतानं पहिल्या सामन्यात ११-१ असा विजय मिळवला होता आणि अमेरिकेला पराभूत केले. भारतानं दोन सामन्यांत ३५ गोल्स केले. भारतानं अमेरिकेवर २३ गोल्सच्या फरकानं मिळवलेला विजय हा ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात ध्यानचंद यांनी ८ गोल्स आणि रुप सिंग यांनी १० गोल्स केले होते. भारताचे हे ऑलिम्पिकमधील सलग दुसरे सुवर्णपदक होते. भारतीय पुरूष हॉकी संघानं आठ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. १९८०नंतर भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिक पदकासाठी ४१ वर्ष प्रतीक्षा पाहावी लागली. 

२००८मध्ये बिंद्रानं १० मीटर एअर रायफल स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावले. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. त्यानंतर टोकियोत नीरज चोप्रानं हा पराक्रम करून दाखवला.

 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021ShootingगोळीबारHockeyहॉकी