शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

Lovlina Borgohain : लवलिनाच्या पदकानं गावाचं नशिब बदललं, सरकारनं घरापर्यंत बनवला पक्का रस्ता 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 4:32 PM

Lovlina Borgohain : लवलिनाने जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती. या विजयासह लवलिनाने इतिहास रचत भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले होते.

Tokyo Olympics 2020 : गुवाहाटी : महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनाने इतिहास रचला आहे. सेमिफायनलमध्ये तिचा पराभव झाला असला तरी तिने देशासाठी कास्य पदक जिंकले आहे. सेमिफायनलमध्ये तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीने लवलिनाचा पराभव केला. लवलिनाने जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती. या विजयासह लवलिनाने इतिहास रचत भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले होते. (assam government gift to lovlina borgohain who won medal in tokyo olympics)

लवलिना आज कास्य पदकाचे रुपांतर सुवर्ण किंवा रौप्य पदकात करण्यासाठी मैदानात उतरली होती. मात्र तिला पदकाचा रंग बदलण्यात यश मिळाले नाही. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीने या विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, कास्य पदक निश्चित केल्यानंतर लवलिनाच्या या कामगिरीनंतर आसाम सरकारने तिला एक अनोखे गिफ्ट दिले आहे. तिच्या घरापर्यंत जाणारा पक्का रस्ता सरकारकडून तयार करण्यात आला आहे. स्थानिक आमदार बिस्वजीत फूकन यांनी लवलिनाच्या घरापर्यंत जाणारा रस्ता बनवून घेतला आहे. 

लवलिनाबद्दल अभिमान असल्याने तिचे वडील टिकेन यांनी म्हटले आहे. लवलिनाने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे, सरकारने रस्ता तयार केला आहे आणि मला खूप आनंद झाला आहे. कारण हे लवलिना आणि आमचे गाव या दोघांसाठी सरकारकडून बक्षीस दिल्यासारखे आहे, असे टिकेन यांनी सांगितले. तर तिच्या गावातील रहिवासी रितुराज म्हणाला, आसाम सरकारने लवलिनाला प्रगती करण्यास मदत केली आहे. तिच्या सरावाला मदत करण्यासाठी, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एकूण 7 लाखांपैकी 5 लाख दिले आहेत. पहिल्या दिवशी जेव्हा तिला पदक मिळाले, तेव्हा स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आणि चांगली बातमी अशी आहे की, तेव्हापासून त्यांनी रस्ता  बनवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. 

आसामच्या छोट्या खेड्यातून सुरु झाला प्रवासआसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील  बाडा मुखिया गावात राहणाऱ्या लवलिनाने मोठ्या संघर्षातून हे यश मिळवले आहे. लवलिना या भागात खूप लोकप्रिय आहे. लवलिनाला तिच्या कामगिरीच्या बळावर मानाचा अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे. भारताच्या दुर्गम भागातून आलेल्या अन्य काही खेळाडूंसारखाच लवलीनाचा संघर्ष आहे. आर्थिक संकाटाचा सामना करत लवलिनाने ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. 

लवलिनाच्या दोन बहिणीही बॉक्सिंगमध्येलवलिना बॉरगोहेनचा जन्म 2 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. तिचे वडील टिकेन आणि आई मामोनी बॉरगोहेन. वडील टिकेन एक छोटे व्यापारी तर आई गृहिणी. आपल्या मुलीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवलिनाच्या आईवडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. लवलिनाला तीन बहिणी आहेत. तिच्या दोन मोठ्या बहिणी  लिचा आणि लीमा यांनी आधी किक बॉक्सिंग सुरु केली. त्यानंतर लवलिनाही किकबॉक्सिंगमध्ये आली. 

टॅग्स :Assamआसामboxingबॉक्सिंग