भारतीय संघाचा पाकिस्तानकडून पराभव, रौप्यपदकावर समाधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 15:18 IST2018-09-22T15:17:53+5:302018-09-22T15:18:29+5:30
Asian Team Snooker Championship: भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पुन्हा समोरासमोर येणार आहे. मात्र, या सामन्याच्या पुर्वसंध्येला भारताला पाकिस्तानकडून हार मानावी लागली.

भारतीय संघाचा पाकिस्तानकडून पराभव, रौप्यपदकावर समाधान
दोहा : भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पुन्हा समोरासमोर येणार आहे. मात्र, या सामन्याच्या पुर्वसंध्येला भारतालापाकिस्तानकडून हार मानावी लागली. आशियाई सांघिक स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानने 3-2 अशा फरकाने भारताचा पराभव केला.
India-1 (Pankaj Advani, Manan Chandra, Malkeet Singh) settles for #Silver at #AsianTeamSnooker Championship 2018 held at #Doha, #Qatar#Snookerhttps://t.co/IrxKQ3KTo1pic.twitter.com/avPO8JE1xo
— Cue Sports India 🇮🇳 (@cuesportsindia) September 22, 2018
बाबर मासिहने 81 गुणांचा ब्रेकसह पहिल्या सामन्यात पंकज अडवाणीवर 110(81)-2 असा विजय मिळवला. मात्र, मलकित सिंगने दुसऱ्या सामन्यात मोहम्मद आसिफला 81(52)-47 असे नमवत सामना 1-1 अशा बरोबरीत आणला. दुहेरीत आसिफ आणि मासिह यांनी चुरशीच्या सामन्यात 72-70 असा निसटता विजय मिळवून पुन्हा आघाडी घेतली. एकेरीच्या परतीच्या लढतीत पंकजने 107(68)-5 अशा फरकाने आसिफला सहज नमवले.
त्यामुळे 2-2 अशा बरोबरीनंतर सामना निर्णायक फ्रेममध्ये गेला. त्या मलकितला मासिहकडून 18-98 अशी हार मानावी लागली आणि भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
Congratulations @PankajAdvani247@mananchandra and #MalkeetSingh for the Silver at #AsianTeamSnooker Championship 2018 https://t.co/EhoT9Ru4w5
— Vivek Pathak 🇮🇳 (@pafcoms) September 22, 2018