पदकविजेत्या दिव्याने सुनावले अरविंद केजरीवाल यांना खडे बोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 20:27 IST2018-09-05T20:26:22+5:302018-09-05T20:27:12+5:30
स्वागत करत असताना पदकविजेती महिला कुस्तीपटू दिव्या काकरानने केजरीवाल यांना खडे बोल सुनावले आहेत.

पदकविजेत्या दिव्याने सुनावले अरविंद केजरीवाल यांना खडे बोल
नवी दिल्ली, आशियाई क्रीडा स्पर्धा : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पदकविजेत्यांचे देशात सर्त्र स्वागत होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील पदकविजेत्यांचा सत्कार करण्याचे ठरवले होते. खेळाडूंना आमंत्रण पाठवले गेले. खेळाडूही कार्यक्रमाला आले. केजरीवाल यांनी त्यंचे स्वागत केले. पण हे स्वागत करत असताना पदकविजेती महिला कुस्तीपटू दिव्या काकरानने केजरीवाल यांना खडे बोल सुनावले आहेत.
इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दिव्याने कांस्यपदक पटकावले होते. त्यामुळे केजरीवाल यांनी दिव्यालाही सत्कार कार्यक्रमाला बोलावले होते. पण दिव्याने आपल्याच राज्यांच्या मंत्र्यांना यावेळी घरचा अहेर दिला आहे.
दिव्या म्हणाली की, " आता पदक जिंकल्यावर तुम्ही आमचा सत्कार करत आहात. बक्षिसे देत आहात. पण खरी गरज जेव्हा आम्ही स्पर्धेची तयारी करत असतो तेव्हा असते. एखाद्या गरीब घरच्या खेळाडूला जर स्पर्धेपूर्वी मदत केली तर तो चांगली कामगिरी करून दाखवू शकतो. त्यामुळे यापुढे स्पर्धेच्या तयारीच्यावेळी खेळाडूंना मदत करा. "