शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात भाला बराच लांब फेकला, पण आयोजकांमुळे गोंधळ झाला अन्.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 4:53 PM

Asian Games 2023 Neeraj Chopra : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली.

Asian Games 2023 Neeraj Chopra : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ७४ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली. त्यापैकी सर्वाधिक २३ पदकं ही ॲथलेटिक्समध्ये मिळवलेली आहेत आणि आज त्यात आणखी भर पडणार हे पक्कं आहे. नेमबाजीत भारतीयांनी २२ पदकं जिंकली आहेत. नीरज चोप्राच्या ( Neeraj Chopra)च्या कामगिरीकडे आज सर्वांच्या नजरा होत्या आणि त्याने पहिल्याच प्रयत्नात ८५ मीटरच्या पार भाला फेकला. पण, १५-२० मिनिटे झाले तरी त्याने नेमकं किती अंतर पार केले हेच दाखवले नाही. त्यामुळे बराच गोंधळ उडाला. 

- भारतीय महिला कबड्डी संघाचे पदक पक्के! गटातील शेवटच्या सामन्यात थायलंडवर ५४-२२ असा विजय, उपांत्य फेरीत धडक.. भारतीय महिलांनी साखळी गटात दोन विजय व एक ड्रॉ असा निकाल लावला. - भारताच्या पुरुष हॉकी संघाने उपांत्य फेरीच्या लढतीत दक्षिण कोरियावर ५-३ असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष संघाने १९६६, १९९८ आणि २०१४ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. मागच्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. - स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या सौरव घोषालने फायनलमध्ये प्रवेश केला. त्याने उपांत्य फेरीत त्याने हेन्री लीयूंगचा ११-२, ११-१, ११-६ असा पराभव केला. 

भालाफेकीत नीरज चोप्रा आणि किशोर कुमार जेना हे दोन भारतीय जेतेपदाच्या शर्यतीत होते. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुखापतीमुळे माघार घेतली, तो मागील आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता होता. २०१८मध्ये नीरजने ८८.०६ मीटर लांब भालाफेक करून आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते आणि जेतेपद कायम राखण्याचे आव्हान स्वीकारून तो मैदानावर उतरला. तैपेईचा चेंग चाओ-त्सून हा ९० मीटरच्या वर भालाफेकणारा पहिला आशियाई खेळाडू आहे आणि त्याचा आज पहिलाच प्रयत्न अपयशी ठरला.  तांत्रिक कारणामुळे नीरजचा पहिला प्रयत्नाची नोंद न झाल्याने त्याला पुन्हा भाला फेकावा लागला.  

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Neeraj Chopraनीरज चोप्रा