Asian Games 2023 : हल्ला बोल! भारतीय हॉकी संघाची स्वप्नपूर्तीच्या दिशेने झेप; फायनलमध्ये प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 03:06 PM2023-10-04T15:06:23+5:302023-10-04T15:06:47+5:30

दक्षिण कोरियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने दणदणीत विजयाची नोंद केली आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने झेप घेतली.

Asian Games 2023 Hockey India vs Korea : Breaking: India advance into FINAL of Men's Hockey, India BEAT South Korea 5-3 in Semis.   | Asian Games 2023 : हल्ला बोल! भारतीय हॉकी संघाची स्वप्नपूर्तीच्या दिशेने झेप; फायनलमध्ये प्रवेश 

Asian Games 2023 : हल्ला बोल! भारतीय हॉकी संघाची स्वप्नपूर्तीच्या दिशेने झेप; फायनलमध्ये प्रवेश 

googlenewsNext

Asian Games 2023 Hockey India vs Korea : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने गटात दमदार कामगिरी करताना ५ सामन्यांत ५८ गोल्सचा पाऊस पाडून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. आज दक्षिण कोरियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने दणदणीत विजयाची नोंद केली आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने झेप घेतली. ९ वर्षानंतर भारतीय संघाला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे. त्यांच्यासमोर चीन किंवा जपान यांच्यापैकी एकाचे आव्हान असेल. 


भारताच्या नावावर आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीत ४ सुवर्ण, ११ रौप्य व ६ कांस्यपदकं आहेत. पुरुष संघाने १९६६, १९९८ आणि २०१४ मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. मागच्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे तब्बल ९ वर्षानंतर पुन्हा सुवर्णपदक जिंकण्याचा पुरुष संघाचा प्रयत्न आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने पहिल्या क्वार्टरमध्येच २-० अशी आघाडी घेतली. हार्दिक सिंग ( ५ मि.) व मनदीप सिंग ( ११ मि.) यांनी हे गोल केले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये ललित उपाध्येयने गोल करून ही आघाडी ३-० अशी मजबूत केली, परंतु कोरियाकडून प्रतिवार झाला. मांजी जुंगने १७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून आलेल्या चेंडूला गोलपोस्टची दिशा दाखवली. त्यानंतर २०व्या मिनिटाला मांजीने आणखी एक अप्रतितम गोल केला आणि पिछाडी २-३ अशी कमी केली.


दक्षिण कोरियाच्या नावावरही आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष हॉकीची चार सुवर्णपदकं आहेत. ३०व्या मिनिटाला भारताच्या अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर संधी साधली अन् तेजतर्रार शॉर्ट्स मारून भारताला चौथ्या गोल मिळवून दिला. भारताच्या वरुण कुमारचा पाय मुरळल्याने मैदानाबाहेर जावे लागले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाचा बचावात्मक पवित्रा दिसला, परंतु हे सत्र संपता संपता कोरियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणइ त्यावर मांजीने हॅटट्रिक केली आणि पिछाडी ३-४ अशी आणखी कमी केली.

चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघावर दडपण होते आणि कोरियाने त्यांच्या खेळाचा दर्जाही चांगला वाढवला होता. सामना संपायला ७ मिनिटांहून कमी कालावधी शिल्लक असताना अभिषेकने वेगवान रिव्हर्स फटका मारून भारतासाठी पाचवा आणि महत्त्वाचा गोल केला. साडेतीन मिनिटांचा खेळ शिल्लक असताना कोरियाने त्यांचा गोलरक्षक हटवला अन् एक अतिरिक्त खेळाडू मैदानावर उतरवला. भारताने हा सामना ५-३ असा जिंकला. 

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमधील सोयी-सुविधा-सज्जता आणि एकंदर व्यवस्थेला तुम्ही १० पैकी किती गुण द्याल?

दहा (97 votes)
सात ते नऊ (169 votes)
चार ते सहा (556 votes)
एक ते तीन (1314 votes)
शून्य (2156 votes)

Total Votes: 4292

VOTEBack to voteView Results

Web Title: Asian Games 2023 Hockey India vs Korea : Breaking: India advance into FINAL of Men's Hockey, India BEAT South Korea 5-3 in Semis.  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.