Asian Games 2023 : ७२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात जे कुणालाच नाही जमले ते अनू राणीने करून दाखवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 06:52 PM2023-10-03T18:52:49+5:302023-10-03T18:54:02+5:30

Asian Games 2023 : आज भालाफेकीत ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. अनू राणीने ( Annu Rani) महिलांच्या भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले.

Asian Games 2023 : Annu Rani became the first ever Indian women javelin thrower to win Gold medal in the 72 years history of Asian Games . Annu won gold medal with a throw of 62.92m to win 2nd Asian Games medal | Asian Games 2023 : ७२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात जे कुणालाच नाही जमले ते अनू राणीने करून दाखवले 

Asian Games 2023 : ७२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात जे कुणालाच नाही जमले ते अनू राणीने करून दाखवले 

googlenewsNext

Asian Games 2023 : भारताच्या पारुल चौधरीने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये आज ५००० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकले. पारुलने काल ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले होते आणि आज तिने सुवर्ण इतिहास लिहिला. पारुलने  शेवटच्या ३० मीटरमध्ये जबरदस्त पुनरागमन करताना १५ मिनिटे १४. ७६ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक नावावर केले. आज भालाफेकीत ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. अनू राणीने ( Annu Rani) महिलांच्या भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले. २०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या अनूने आज इतिहास लिहिला. ७२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात भालाफेकीत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. अनूने ६२.९२ मीटर लांब भालाफेकला. 


अॅथलेटिक्समध्ये आज महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरीने रौप्य आणि प्रिती लांबाने कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकात भर घातली. पारूलने ९ मिनिटे २७.६३ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. मंगळवारी पीटी उषाचा ३९ वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडणाऱ्या विथ्या रामराजने ४०० मीटर हर्डलमध्ये आज ५५.६८ सेकंदाची वेळ नोंदवरून कांस्यपद नावावर केले.  त्यानंतर पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीत मोहम्मद अफसलने १ मिनिट ४८.४३ सेकंदच्या वेळेसोबत रौप्यपदक जिंकले. तिहेरी उडीत प्रविणने कांस्यपदक, बॉक्सिंगमध्ये ९२ किलो वजनी गटात नरेंदर बरवालने कांस्यपदक जिंकले. 

Web Title: Asian Games 2023 : Annu Rani became the first ever Indian women javelin thrower to win Gold medal in the 72 years history of Asian Games . Annu won gold medal with a throw of 62.92m to win 2nd Asian Games medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.