Asian Games 2018 LIVE: वुशूमध्ये भारताला चार पदके

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:27 AM2018-08-22T11:27:02+5:302018-08-22T20:32:22+5:30

जकार्ता आणि पालेमबांगमध्ये होणा-या आशियाई स्पर्धेचा आजचा चौथा दिवस आहे. आजच्या दिवशीही भारतीय खेळाडूंकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.

asian games 2018 live updates day 4 at jakarta palembang | Asian Games 2018 LIVE: वुशूमध्ये भारताला चार पदके

Asian Games 2018 LIVE: वुशूमध्ये भारताला चार पदके

googlenewsNext

जकार्ता आणि पालेमबांगमध्ये होणा-या आशियाई स्पर्धेचा आजचा चौथा दिवस आहे. आजच्या दिवशीही भारतीय खेळाडूंकडून पदकाच्या अपेक्षा आहेत. भारताच्या पारड्यात सध्या 15 पदके आहेत. भारत पदतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. भारताकडे आतापर्यंत 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 8 कास्य पदकांची कमाई झाली आहे. पहिल्या तीन दिवसांत भारताकडून कुस्ती, शूटिंगमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली. 

Asian Games Live... 

वुशू खेळात भारताने पटकावली चार कांस्यपदके



 

 



 

-  भारताच्या संतोषकुमारने पुरुषांच्या वुशू सँडा 56 किग्रॅ. क्रीडा प्रकारात पटकावले कांस्यपदक 



 

- भारताच्या रोशिबिना देवी हिने महिलांच्या वुशू  सँडा 60 किग्रॅ प्रकारात पटकावले कांस्यपदक 



 

-  राही सरनोबतला  महिलांच्या 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक



 

- हॉकी : भारताच्या गोलधडाका : हॉगकाँगवर 26-0 ने रेकॉर्डब्रेक विजय  



 

- भारताचे तीन पैलवान ग्रेको रेमन प्रकारात विविध श्रेणीत उपांत्य फेरीत

 - हॉकी : हॉगकाँगविरुद्धच्या लढतीत पहिल्या क्वार्टरमध्ये भारताचे सहा गोल



 

कुस्ती : पुरुषांच्या 77 किलो वजनी गटात गुरप्रीत सिंहची थाइलंडच्या नातल आपिचाईवर मात



 

कुस्ती : पुरुषांच्या ग्रीको रोमन 87 किलो वजनी गटात भारताच्या हरप्रीत सिंहची शानदार सुरुवात, कोरियाच्या पार्क हेग्यूला 4-1 ने केले पराभूत.  


जलतरण: पुरुष 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात संदीप शेजवळचे आव्हान संपुष्टात. 

टेनिस :  पुरुष एकेरी स्पर्धेतील 16 व्या फेरीत भारताच्या रामकुमार रामनाथनचा उज्बेकिस्तानच्या जुराबेक करिमोबकडून 6-3, 4-6, 3-6 असा पराभव.

वुशु : पुरुष गटात भारता ज्ञानेंद्र सिंह मयंगम्बम पदाकापासून दूर, फायनलमध्ये  9.70 च्या स्कोरसहीत चौथ्या स्थानावर...

शूटिंग : महिलांच्या 50 मीटर रायफल शूटिंगच्या थ्री पोजीशन प्रकारात अंजुम मुद्गील आणि गायत्री नित्यानंदन स्पर्धेतून बाहेर.



 

टेनिस : अंकिता रैनाने क्वॉर्टर फायनलमध्ये हाँगकाँगच्या चोंग उडीस वोंग हिला सरळ सेटमध्ये 6-4, 6-1 असे पराभूत केले. यामुळे महिला एकेरी सेमिफायनलमध्ये स्थान मिळाले आहे. तसेच, तिला ब्रॉन्ज पदक निश्चित आहे. 



 

Web Title: asian games 2018 live updates day 4 at jakarta palembang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.