Asian Games 2018 : दिशाभूल केल्याने ट्रायथ्लॉनच्या संपूर्ण संघाला डच्चू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 23:28 IST2018-07-07T23:28:25+5:302018-07-07T23:28:53+5:30

फुटबॉल संघानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आशियाई स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय चमूतून ट्रायथ्लॉनच्या संपूर्ण संघाला वगळण्याचा निर्णय घेतला. दिशाभूल करणारी माहिती मिळाल्यामुळे आशियाई स्पर्धेसाठीच्या चमूत ट्रायथ्लॉनच्या संघाला स्थान देण्यात आल्याचे आयओएने सांगितले.

Asian Games 2018: Leaving the entire team of Triathlon misguided |  Asian Games 2018 : दिशाभूल केल्याने ट्रायथ्लॉनच्या संपूर्ण संघाला डच्चू 

 Asian Games 2018 : दिशाभूल केल्याने ट्रायथ्लॉनच्या संपूर्ण संघाला डच्चू 

 नवी दिल्ली - फुटबॉल संघानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आशियाई स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय चमूतून ट्रायथ्लॉनच्या संपूर्ण संघाला वगळण्याचा निर्णय घेतला. दिशाभूल करणारी माहिती मिळाल्यामुळे आशियाई स्पर्धेसाठीच्या चमूत ट्रायथ्लॉनच्या संघाला स्थान देण्यात आल्याचे आयओएने सांगितले. आयओएने 3 जुलैला 524 सदस्यीय चमू जाहीर केला होता. त्यातील सहा खेळाडूंनाही विविध कारणास्तव डच्चू देण्यात आला आहे. यात पाच खेळाडू क्लांयबिंग संघातील आहेत. 
क्लांयबिंग खेळाडूंनाही सुरूवातीच्या यादित स्थान दिलेले नव्हते, परंतु त्यांना नंतर संधी दिली. त्यातूनही पाच खेळाडूंना वगळले आणि उर्वरीत 3 खेळाडूंचे भवितव्य आशियाई स्पर्धा आयोजकांच्या मान्यतेवर अवलंबून आहे. याशिवाय दहा सदस्यीय जलतरण संघातही बदल करण्याचा निर्णय प्रदीर्घ बैठकीनंतर घेण्यात आला. तीन सदस्यीय तलवारबाजीचा संघ आशियाई चमूत समाविष्ट करण्यात आला आहे.
'' ट्रायथ्लॉन महासंघाने दिशाभूल केली होती आणि ते उघड झाल्याने त्यांना वगळण्याचा निर्णय घेतला. हा खेळ प्रथमच आशियाई स्पर्धेत खेळवण्यात येत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र, दुस-यांदा किंवा तिस-यांदा हा खेळ होत आहे आणि भारताला अव्वल 15 संघांमध्येही स्थान मिळवता आलेले नाही, " असे आयओएचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी सांगितले.  
 

Web Title: Asian Games 2018: Leaving the entire team of Triathlon misguided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा