Asian Games 2018: विनेश फोगटकडून सुवर्णपदकाची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 16:06 IST2018-08-20T16:04:53+5:302018-08-20T16:06:06+5:30
विनेशने उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या याकशितमुराकोव्हावर 10-0 असा दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

Asian Games 2018: विनेश फोगटकडून सुवर्णपदकाची अपेक्षा
जकार्ता : भारताच्या विनेश फोगटकडून आता भारताला अपेक्षा असतील त्या सुवर्णपदकाच्या. कारण महिलांच्या कुस्तीतील 50 किलो वजनी गटामध्ये विनेशने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. विनेशने उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या याकशितमुराकोव्हावर 10-0 असा दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
News Flash: Wrestling | Vinesh Phogat storms into Final (50 kg) with comprehensive 10-0 win over Uzbek grappler #AsianGames2018pic.twitter.com/uyQhaEZmla
— India@AsianGames2018 (@India_AllSports) August 20, 2018
विनेशची आतापर्यंतची आशियाई स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. कारण यापूर्वी विनेशला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले होते. पण आता अंतिम फेरीत विनेश जिंकली तर सुवर्ण आणि पराभूत झाली तर तिला रौप्यपदक मिळू शकते. विनेशने गोल्डकोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.