शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

Asian Games 2018: वडिलांचा कँसरशी संघर्ष, मुलानं लिहिला सुवर्ण इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 12:05 PM

Asian Games 2018: ' सोच किस लिये खेल रहा है! तुने करना है!,' तेजिंदरपाल सिंग तूर जेव्हा गोळाफेक करत होता त्यावेळी स्टेडियमवर उपस्थित असलेले प्रशिक्षक मोहिंदर सिंग ढिल्लोन जोरदारात ओरडत होते.

ठळक मुद्देआशियाई स्पर्धेचे सराव शिबीर पतियाळा येथे भरलेले होते. त्यावेळी तो सरावाचे वेळापत्रक सांभाळून लुधियानाला आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जायचा.

मुंबई - ' सोच किस लिये खेल रहा है! तुने करना है!,' तेजिंदरपाल सिंग तूर जेव्हा गोळाफेक करत होता त्यावेळी स्टेडियमवर उपस्थित असलेले प्रशिक्षक मोहिंदर सिंग ढिल्लोन जोरदारात ओरडत होते. ते असे का बोलत आहेत, याचे उत्तर स्पर्धा संपेपर्यंत कोणालाच मिळाले नव्हते. तेजिंदरने २०.७५ मीटर गोळाफेक करून भारताच्या खात्यात सुवर्ण जमा केले आणि हळूहळू सर्व गोष्टी उलगडत गेल्या. तेजिंदर जकार्तात भारताला पदक मिळवून देण्यासाठी झगडत होता, तर पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील खोसा पांडो गावात त्याचे वडिल करम सिंग हे घश्याच्या कँसरशी झुंज देत आहेत. अशा कठीण प्रसंगात अडकलेल्या तेजिंदरने स्वतःचे लक्ष जराही विचलित होऊ न देता सुवर्णपदक जिंकले. त्या विजयानंतर त्याच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू सर्व काही सांगून गेले. 

शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या तेजींदरने वडिलांखातर गोळाफेक खेळाची निवड केली. 2017च्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 20.40 मीटर गोळाफेकला होता. मात्र, त्याला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रतेसाठीचे 20.50 मीटर अंतर गाठता आले नाही. त्यानंतर 2017च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तूरने 19.77 मीटरसह रौप्यपदक जिंकले होते. अवघ्या 0.03 मीटरने त्याचे सुवर्णपदक हुकले होते. 

आशियाई स्पर्धेचे सराव शिबीर पतियाळा येथे भरलेले होते. त्यावेळी तो सरावाचे वेळापत्रक सांभाळून लुधियानाला आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जायचा. काही काळ त्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवरही झाला होता. मात्र, प्रशिक्षकांनी समजावल्यानंतर त्याने सरावावर लक्ष केंद्रित केले. या बलिदानाचे फळ त्याला शनिवारी मिळाले. विजयानंतर त्याने त्वरित आपल्या आईला फोन लावला आणि सुवर्ण जिंकल्याची बातमी बाबांना सांग, असे सांगितले. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडा