Asian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 16:30 IST2018-08-21T16:29:12+5:302018-08-21T16:30:35+5:30
शेतीचं काम करून सौरभने कसं पटकावलं सुवर्ण, त्याच्या या यशाची गाथा, संघर्षाचा प्रवास, आशियाई स्पर्धेत कसं पिकवलं सोनं, या गोष्टी तुम्ही जाणून घ्या.

Asian Games 2018: शेतकऱ्याच्या मुलानं पिकवलं आशियाई स्पर्धेत सोनं
नवी दिल्ली : सौरभ चौधरी... वय वर्षे अवघे सोळा... आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालणारा भारताचा युवा तारा... पण हा सुवर्णपुत्र जन्माला आला तो एका गरीब शेकऱ्याच्या घरात. शेतीचं काम करून सौरभने कसं पटकावलं सुवर्ण, त्याच्या या यशाची गाथा, संघर्षाचा प्रवास, आशियाई स्पर्धेत कसं पिकवलं सोनं, या गोष्टी तुम्ही जाणून घ्या.
मेरटमधील कलिना गावात सौरभचा जन्म झाला. वयाच्या तेराव्या वर्षांपर्यंत सौरभ शेतीचं काम करत होता. शेतीत तो रमत असला तरी त्याच्यातले गुण प्रशिक्षकांनी हेरले. त्यानंतर तीन वर्षांतच त्याने ही गगन भरारी घेतली. पण सुवर्णपदक पटकावल्यावरही सौरभला आठवण आली ती आपल्या शेताची.
सुवर्णपदक पटकावल्यावर सौरभ म्हणाला की, " मला शेती करायला आवडते. नेमबाजीचा सराव करत असताना मला जास्त वेळ गावी जाऊन शेती करायला मिळाली नाही. पण जेव्हा जेव्हा गावी गेलो तेव्हा नक्कीच मी शेतात जायचो. वडिलांना मदत म्हणून शेतीचे करायचो. "