Asian Games 2018 : भारतीय पुरूष व मिश्र संघांना कांस्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 06:15 IST2018-08-27T06:14:32+5:302018-08-27T06:15:07+5:30
Asian Games 2018 : भारताच्या पुरुष व मिश्र संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश झालेल्या ब्रिज क्रीडा प्रकारात उपांत्य फेरीत पराभव

Asian Games 2018 : भारतीय पुरूष व मिश्र संघांना कांस्यपदक
जकार्ता : भारताच्या पुरुष व मिश्र संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश झालेल्या ब्रिज क्रीडा प्रकारात उपांत्य फेरीत पराभव पत्कारावा लागल्यामुळे कास्यंपदकावर समाधान मानावे लागले. पुरूष संघाला सिंगापूरकडून तर मिश्र संघाला थायलंडकडू न पराभूत व्हावे लागल.
पात्रता फेरीनंतर पुरूष संघ चौैथ्या तर मिश्र संघ अग्रस्थानी राहिले होते. सुपर मिश्र संघात उपांत्य फेरीसाठी पात्र होऊ शकला नाही. भारताच्या पुरूषांच्या ६ सदस्यीय संघामध्ये जग्गी शिवदसानी, राजेश्वर तिवारी, अजय खरे, राजू तोलाणी, देवब्रत, मुजुमदार आणि सुमीत मुखर्जी यांचा समावेश होता. दुसरीकडे मिश्र संघामध्ये किरण नाडर, हेमा देवरा, हिमानी खंडेलवाल, बचिराजू सत्यनारायण, गोपीनाथ मण्णा आणि राजीव खंडेलवाल यांनी भारतीय संघाची आघाडी सांभाळली.