Asian Games 2018: लव्ह में कुछ भी?... नीरज पोहोचला कुस्ती संकुलात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 06:52 IST2018-08-23T06:01:36+5:302018-08-23T06:52:14+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धेतील कुस्ती संकुलात विनेश फोगटचा अंतिम सामना पाहण्यासाठी भारताचा अव्वल भाला फेकपटू नीरज चोप्रा कुस्ती संकुलात पोहोचला

Asian Games 2018: लव्ह में कुछ भी?... नीरज पोहोचला कुस्ती संकुलात
- अभिजीत देशमुख
जकार्ता: प्रेमासाठी प्रेमवीर काहीही करतात, आणि ते मिळविण्यासाठी आणि आपल्या प्रेमाखातर कोठेही प्रवास करतात. आशियाई क्रीडा स्पर्धेतील कुस्ती संकुलात विनेश फोगटचा अंतिम सामना पाहण्यासाठी भारताचा अव्वल भाला फेकपटू नीरज चोप्रा कुस्ती संकुलात पोहोचला, तेव्हा त्याला ओळखणाऱ्या भारतीय पत्रकार आणि काही भारतीय प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या.
काही वृत्तपत्रांनी लगेचच त्याचे आणि विनेशचे नक्कीच काही तरी प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा सुरू केली. त्यामुळेच तो ही लढत पाहण्यासाठी आहे. पण नीरजने स्पष्ट सांगितले की, तुम्ही म्हणता तसे काही नाही, मला वेळ होता आणि आपल्या खेळाडूला अंतिम लढतीत प्रोत्साहन देण्यासाठी येथे आलो आहे. मला येऊन फक्त दोनच मिनिटे झाली आहे. नीरज चोप्रा आणि त्याचा सहयोगी, मीडिया प्रेस सेंटरमध्ये पोहोचले. यामुळे नीरज चोप्राने विनेश फोगटची पूर्ण लढत पहिलीच नाही. सामना जसा संपला तसा नीरज परत निघाला, पदक वितरणसाठी थांबलासुद्धा नाही.