शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 17:15 IST

चीनचा संघ पहिल्यांदाच फायनलपर्यंत पोहचला होता. घरच्या मैदानावर चीनच्या संघाने भारताला कडवी टक्कर दिली. पण शेवटी ते हतबल ठरले.

Asian Champions Trophy 2024 India vs China Final : आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहाव्यांदा फायनल खेळणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. चीन विरुद्धच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या क्वार्टरपर्यंत दोन्ही संघाला गोल डागता आला नव्हता. सलामीच्या सामन्यात ज्या चीनला भारताने सहज मात दिली तो संघ एका वेगळ्यात ढंगात खेळताना दिसला. भारतीय पुरुष हॉकी संघाने सुरुवातीला काही संधी निर्माण केल्या. पण चीनच्या गोलीनं सर्वोत्तम खेळाचा नजराणा पेश करत भारताचे प्रयत्न अपयशी ठरवले. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत एकाही संघाला गोल नोंदवता आला नाही.

 

जुगराजनं गोल केला, अन् तमाम भारतीय चाहत्यांचा जीवात जीव आला

 पण चौथ्या आणि अखेरच्या क्वॉर्टरमध्ये  ड्रॅग फ्लिकर जुगराज सिंग याने भारताकडून पहिला गोल डागला. त्याच्या या गोलच्या जोरावर भारताने रंगतदार झालेल्या अंतिम  सामन्यात आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत भारताने   पाचव्यांदा आशियाई किंग होण्याचा पराक्रम करून दाखवला. चीनचा संघ पहिल्यांदाच फायनलपर्यंत पोहचला होता. घरच्या मैदानावर चीनच्या संघाने भारताला कडवी टक्कर दिली. पण शेवटी ते हतबल ठरले.

प्रत्येक सामन्यात भारतीय संघाने मारली बाजी  

पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा कांस्य पदक जिंकणारा आणि गत चॅम्पियन भारतीय संघ सुरुवातीपासूनच या स्पर्धेचा प्रबळ दावेदार होता. घरच्या मैदानात खेळणाऱ्या चीन विरुद्धच्या लढतीनंच भारताने या स्पर्धेतील विजयी मोहिमेला सुरुवात केली होती. यजमान चीन शिवाय भारतीय संघाने जपान, मलेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया आणि पाकिस्तान यांना पराभूत केले होते. साखळी फेरीनंतर उपांत्य फेरीत भारताने दक्षिण कोरियाला दुसऱ्यांदा मात देत अपराजित राहत फायनल गाठली. एवढेच नाही तर फायनल बाजीही मारली.

टॅग्स :HockeyहॉकीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघchinaचीन