स्मृती मानधना आणि रोहन बोपण्णा यांना अर्जुन पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 23:13 IST2019-07-16T23:10:47+5:302019-07-16T23:13:15+5:30

गेल्या वर्षभरात स्मृती आणि रोहन यांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती.

Arjuna Award for Smriti Manadhana and Rohan Bopanna | स्मृती मानधना आणि रोहन बोपण्णा यांना अर्जुन पुरस्कार प्रदान

स्मृती मानधना आणि रोहन बोपण्णा यांना अर्जुन पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि टेनिसपटू रोहन बोपण्णा यांना आज अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारताचे क्रीडा मंत्रा किरेन रिजिजू यांच्या हस्ते स्मृती आणि रोहन यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.


गेल्या वर्षभरात स्मृती आणि रोहन यांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यामुळे दोन्ही खेळाडूंच्या संघटनांनी त्यांच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली होती. या शिफारशीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि या दोघांना मंगळवारी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Web Title: Arjuna Award for Smriti Manadhana and Rohan Bopanna

टॅग्स :Tennisटेनिस