नरेंद्र मोदी हुकूमशहा नाहीत, तर...; अमित शाह यांच्या विधानावर टेनिस दिग्गज मार्टिना नव्हरातिलोव्हाची कमेंट अन् खवळले समर्थक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 05:26 PM2021-10-11T17:26:48+5:302021-10-11T17:34:53+5:30

अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू मार्टिना नव्हरातिलोव्हा ( Martina Navaratilova) ही सध्या मोदी समर्थकांच्या निशाण्यावर आहे

"And for my next joke...": Tennis legend Martina Navratilova responds to Amit Shah's praise of PM Narendra Modi | नरेंद्र मोदी हुकूमशहा नाहीत, तर...; अमित शाह यांच्या विधानावर टेनिस दिग्गज मार्टिना नव्हरातिलोव्हाची कमेंट अन् खवळले समर्थक!

नरेंद्र मोदी हुकूमशहा नाहीत, तर...; अमित शाह यांच्या विधानावर टेनिस दिग्गज मार्टिना नव्हरातिलोव्हाची कमेंट अन् खवळले समर्थक!

Next

अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू मार्टिना नव्हरातिलोव्हा ( Martina Navaratilova) ही सध्या मोदी समर्थकांच्या निशाण्यावर आहे. १० ऑक्टोबरला तिनं एक ट्विट केलं आणि त्यानंतर खूप मोठा वाद झाला. तिची ही कमेंट खेळासंदर्भात नव्हती, तर राजकिय आहे. मार्टिनानं भारताचे गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) यांच्या विधानाची फिरकी घेतली. त्यानंतर व्हायचं काय होतं, तिचं ट्विट व्हायरल झालं आणि समर्थकांनी तिला झोडून काढले.  

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुलाखत संसद टीव्हीवर प्रसारित करण्यात आली. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशहा नाहीत, तर असे नेते आहेत की त्यांच्यासारखा लोकशाही नेता भारतात झालेला नाही. मोदी प्रत्येक निर्णय हे सर्वांशी सल्ला घेऊनच घेतात. अमित शाह यांचे हे विधान हिंदुस्थान टाईम्सनं प्रसारित केलं आणि त्यावर मार्टिनानं ट्विट केलं. तिनं म्हटलं, आणि हा माझा आणखी एक जोक.''


टेनिस कोर्टवर आक्रमक खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्टिनाचं हे ट्विट मोदी समर्थकांना आवडले नाही आणि त्यांनी तिच्यावर टीका केली.  


Web Title: "And for my next joke...": Tennis legend Martina Navratilova responds to Amit Shah's praise of PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app