शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

Anand Mahindra : मीराबाई चानूमुळे उद्योगपती आनंद महिंद्रा गहिवरले; म्हणाले, माझ्यासाठी ती आता गोल्ड मेडलिस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 10:00 PM

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत २६ वर्षीय मीराबाई चानू हिनं ( Mirabai Chanu)  ४९ किलो वजनी गटात एकूण २०२ किलो ( ८७ +११५ किलो) वजन उचलून रौप्यपदक जिंकले.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत २६ वर्षीय मीराबाई चानू हिनं ( Mirabai Chanu)  ४९ किलो वजनी गटात एकूण २०२ किलो ( ८७ +११५ किलो) वजन उचलून रौप्यपदक जिंकले. २०००च्या सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत कर्नाम मल्लेश्वरीनं कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. मीराबाई हिनं तिच्या यशात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार असलेल्या प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिच्या खडतर काळात मदत करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सचा मीराबाईनं सत्कार केला. हे ट्रक ड्रायव्हर चानूला तिच्या नोंगपोक काकचिंग गावामधील घरापासून खुमान लम्पक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील प्रशिक्षण केंद्रापर्यंत रोज मोफत नेत असत. तिच्या या कृतीनं महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांना स्तब्ध केलं. मीराबाईच्या या कृतीचं कौतुक करणारे ट्विट करून आनंद महिंद्रा यांनी भावना व्यक्त केल्या. ( Anand Mahindra impressed Mirabai Chanu's That gesture) 

आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या कुटुंबात मीराबाई चानूचा जन्म झाला अन् तिच्या प्रशिक्षणावर होणारा रोजचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. प्रशिक्षण केंद्र चानूच्या घरापासून ३० किलो मीटर दूर होते. तिथे जाण्यासाठी तिला १०-२० रुपये दिले जात होते, परंतु ते पुरेसे नसत. असा परिस्थितीत ती तिच्या घराजवळून जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सकडे लिफ्ट मागत असे. त्यावेळी तिच्या मनात संकोच आणि भीती असे. मात्र धीर करून ती ट्रकमधून कोचिंग सेंटरमध्ये जात असे. काही दिवसांनंतर हे ट्रक ड्रायव्हरही तिला ओखळू लागले होते. तसेच तिचे घर जवळ येताच ते लांबूनच हॉर्न वाजवत असत. त्यामुळे चानूला वेळीच तयार होऊन ट्रकपर्यंत पोहोचता येत असे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून मीराबाई घरी परतली अन् तिनं सर्वप्रथम या ट्रक ड्रायव्हर्स व त्यांच्या साहाय्यकांचा सत्कार केला.  त्याच ट्रक ड्रायव्हर्सना मीराबाईनं तिच्या घरी बोलावले अन् त्यांना टी शर्ट, मनीपूरी स्कार्फ आणि जेवायला दिलं. मीराबाईचे ही कृतज्ञता पाहून आनंद महिंद्रा भावूक झाले. ते म्हणाले,''मीराबाई चानूच्या या कृतीमुळे माझ्यासाठी ती सुवर्णपदक विजेती ठरली. तिला त्यांचे पाय पडताना पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आले. आपल्या भारत देशातील ही सर्वात सुंदर भावनांपैकी एक आहे.''  

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Mirabai Chanuमीराबाई चानूAnand Mahindraआनंद महिंद्रा