Anand-Dubov match draw | आनंद-दुबोव्ह लढत बरोबरीत सुटली

आनंद-दुबोव्ह लढत बरोबरीत सुटली

विज्क आन जी : पाच वेळेसचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद आणि रशियाचा दानिल दुबोव्ह यांच्यातील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीतील लढत बरोबरीत सुटली. आनंद पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना फार काही करू शकला नाही. तो ४.५ गुणांसह दहाव्या स्थानी आहे.
अव्वल मानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने इराणच्या अलीरजा फिरोजला नमवले. आठव्यांदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असलेला कार्लसन संयुक्तपणे दुसºया स्थानी आहे. अमेरिकेचा फॅबियानो कारुआना ९ फेºयांत ६ गुणांसह अव्वल स्थानी असून त्याने रशियाच्या निकिता वितुइगोव याला बरोबरी रोखले.

आनंदला आघाडीच्या स्थानांमध्ये जागा मिळवण्यासाठी पुढील सामन्यांमध्ये कामगिरीत सुधारणा करावी लागेल. गेल्या काही स्पर्धांमध्ये आनंद लौकिकानुसार खेळ करण्यात अपयशी ठरला आहे.

Web Title: Anand-Dubov match draw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.