आॅलिम्पिक मशाल बनली विद्यार्थ्याच्या कमाईचे साधन

By Admin | Updated: August 5, 2016 20:35 IST2016-08-05T20:35:51+5:302016-08-05T20:35:51+5:30

आॅलिम्पिक रिलेसाठी वापरण्यात आलेली मशाल एका विद्यार्थ्यासाठी कमाईचे साधन बनली आहे. रिनाल्डो माझ्या या ब्राझिलियन विद्यार्थ्याने आॅलिम्पिकच्या आठवणी जपण्यासाठी आॅलिम्पिक मशाल खरेदी केली होती

The amount of money generated by the student of the Olympic Torch | आॅलिम्पिक मशाल बनली विद्यार्थ्याच्या कमाईचे साधन

आॅलिम्पिक मशाल बनली विद्यार्थ्याच्या कमाईचे साधन

ऑनलाइन लोकमत

रिओ, दि. ५ : आॅलिम्पिक रिलेसाठी वापरण्यात आलेली मशाल एका विद्यार्थ्यासाठी कमाईचे साधन बनली आहे. रिनाल्डो माझ्या या ब्राझिलियन विद्यार्थ्याने आॅलिम्पिकच्या आठवणी जपण्यासाठी आॅलिम्पिक मशाल खरेदी केली होती. पण यात त्याची सगळी बचत संपली. त्यामुळे या मशालीमधून त्याने आता कमाई सुरु केली आहे. २७ वर्षीय माझ्या याने ब्राझीलच्या विविध प्रदेशातून तीन महिने प्रवास केलेली आॅलिम्पिक मशाल १८८0 डॉलर्समध्ये आॅनलाईन खरेदी केली होती. ही मशाल त्याला खूपच महाग पडली, यात त्याची सगळी बचत संपून गेली. म्हणून त्याने यातूनच कमाईचा मार्ग शोधून काढला आहे. तो आता या मशालीसोबत पर्यटकांना आणि खेळाडूंना फोटो काढण्यास भाड्याने देत आहे. यासाठी तो पाच रियास इतका दर आकारतो. त्याने यातून आतापर्यंत ५00 रियासची कमाई केली आहे. स्पर्धा संपेपर्यंत खर्च केलेली रक्कम वसूल होईल असे त्याला वाटते आहे.

पहिल्यांदाच फडकणार कोसोवाचा ध्वज
२00८ मध्ये सर्बियातून स्वतंत्र झालेला कोसोवा यंदा पहिल्यांदाच आॅलिम्पिकमध्ये सहभाग घेत असून क्रीडाग्राममध्ये त्यांचा राष्ट्रध्वज पहिल्यांदाच फडकणार आहे. कोसोवाने २0१४ मध्ये आॅलिम्पिक समितीचे सदस्यत्व घेतले होते. यंदा त्यांनी युएफा आणि फिफाचेही सदस्यत्त्व घेतले आहे. या देशाचा १८ वर्षीय अ‍ॅथलिट विजोना क्रायजियू हा ४00 मीटर शर्यतीत पदकाचा दावेदार आहे. तो म्हणाला, आमच्या देशाकडून पहिल्या आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळते हे माझे भाग्य आहे. याच देशाची दोन वेळेची ज्युडो वर्ल्ड चॅम्पियन मेलिंडा केलमेंडी ही ध्वजवाहक असणार आहे.

तिकीटासाठी तासनतास वेटिंग
आॅलिम्पिक तिकीट विक्रीची व्यवस्था पाहणाऱ्या अमेरिकेच्या कोस्पोर्ट कंपनीकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रेक्षकांना तासनतास रांगेत उभे रहावे लागत आहे.पेन्सिल्वेनिया येथून आलेला एक प्रेक्षक टॉम शोर्कीने सांगितले की, तो गुरुवारीच रिओमध्ये आला आहे.तिकीटासाठी चार तास प्रतिक्षा करुनही त्याला तिकीट मिळालेले नाही. तथापि, कोस्पोर्ट कंपनीकडून अजून याबाबतीच कोणतेच स्पष्टीकरण आलेले नाही. संयोजकांनी सांगितले की. रिओ आॅलिम्पिकची अजून १३ लाख तिकीटे खपलेली नाहीत. यात फुटबॉल सामन्यांच्या तिकीटांचे प्रमाण जास्त आहे.

Web Title: The amount of money generated by the student of the Olympic Torch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.