शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

आमलाचे नाबाद शतक

By admin | Updated: January 4, 2016 23:51 IST

इंग्लंडच्या ६२९ धावांच्या धुवाधार खेळीला दक्षिण आफ्रिकेने संयमी फलंदाजीने प्रत्युत्तर देऊन तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद ३५३ धावा उभारल्या.

केप टाऊन : इंग्लंडच्या ६२९ धावांच्या धुवाधार खेळीला दक्षिण आफ्रिकेने संयमी फलंदाजीने प्रत्युत्तर देऊन तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद ३५३ धावा उभारल्या. हाशीम आमलाने ३७१ चेंडू टोलवून २१ चौकारांसह नाबाद १५७ धावा ठोकून दिवस गाजविला. इंग्लंडने पहिल्या डावात केवळ ७५६ चेंडंूत ६ गड्यांच्या मोबदल्यात ६२९ धावांचा डोंगर उभारला. दीड दिवसात इंग्लंडच्या फलंदाजांनी जवळपास ५ धावगतीच्या सरासरीने ही धावसंख्या उभारली. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने ४३ षटकांत २ बाद १४१ धावा केल्या होत्या. एबी डिव्हिलियर्स (८८)सोबत आमलाने तिसऱ्या गड्यासाठी १८३ आणि फाफ डु प्लेसिससोबत (नाबाद ५१) चौथ्या गड्यासाठी आतापर्यंत ८५ धावांची भागीदारी केली. डिव्हिलियर्स २११ चेंडूंत १२ चौकार व एका षटकाराच्या साह्याने ८८ धावा करून तंबूत परतला. स्टीव्हन फिन याने जेम्स अँडरसनकरवी डिव्हीलियर्सला बाद केले. दोन बाद १४१वरून पुढे सुरुवात करणाऱ्या आफ्रिकेने दिवसभरात २१२ धावांची भार घातली व डिव्हिलियर्सचा बळी दिला. आमलाला आतापर्यंत दोनदा जीवदान मिळाले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : इंग्लंड पहिला डाव : १२५.५ षटकांत ६ बाद ६२९ धावा, एडी हेल्स ६०, निक क्रॉम्पटन ४५, जो रुट ५०, बेन स्टोक्स २५८, जॉनी बेअरस्टो नाबाद १५०, मोइन अली नाबाद ०, १२५.५ षटकांत ६ बाद ६२९ (घोषित), कागिसो रबाडा ३/१७५, ख्रिस मॉरिस १/१५०, मोर्ने मोर्कल १/११४, साऊथ आफ्रिका पहिला डाव : १३० षटकांत ३ बाद ३५३, डीन एल्गर ४४, हाशीम आमला खेळत आहे १५७, एबी डिव्हिलियर्स ८८, फाफ डु प्लेसिस खेळत आहे ५१, बेन स्टोक्स १/५३, स्टीव्हन फिन १/६०.