‘शिवथर श्री’चा मानकरी अमित माळवदे
By Admin | Updated: February 6, 2017 23:36 IST2017-02-06T23:36:38+5:302017-02-06T23:36:38+5:30
शरीरसौष्ठव स्पर्धा : ५५ किलो वजनी गटात निवांत पाडळे

‘शिवथर श्री’चा मानकरी अमित माळवदे
सातारा : सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने व कै. स्वा. किसनराव साबळे-पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत साताऱ्याचा अमित माळवदे ‘शिवथर श्री’चा मानकरी ठरला.
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच किरण साबळे-पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यामध्ये ५० ते ५५ किलो वजनी गटात निवांत पाडळे, किरण मोरे, सुधीर गायकवाड, सिद्धेश शिवणकर, शुभम बनकर.
५५ ते ६० किलो वजनी गटात विश्वनाथ हिनकुले, प्रफुल्ल नायकवडी, विशाल निकम, गणेश कारंडे, किशोर बाबर. ६० ते ६५ किलो वजनी गटात रामा मैनाक, प्रतीक काटकर, अमित गोडसे, विजय जाधव, सुजीत पोळ. ६५ ते ७० किलो वजनी गटात फैय्याज शेख, सनी सय्यद, विक्रम करांडे, शुभम भोईटे, आकाश शेलार. ७० ते ७५ किलो वजनी गटात अमित माळवदे, वैभव जाधव, दिग्विजय डांगे, विशाल परिहार, हर्षल लोहार तसेच ७५ च्या वरील वजनी गटात गौरव यादव, समीर शेख, वैभव गवळी, अभिजित पाडळे, राहुल निकम यशस्वी ठरले. (प्रतिनिधी)
‘शिवथर श्री’चा मानकरी अमित माळवदे याला बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी किरण साबळे-पाटील, राजेंद्र हेंद्रे, मुरली वत्स आदी उपस्थित होते.