शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

शेवटच्या चढाईवर नितीनचे तीन गुण, देना बँक बाद फेरीत, बलाढ्य महिंद्राचे साखळीतच आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 8:20 PM

देना बँकेचा नितीन देशमुख बलाढ्य महिंद्र आणि महिंद्र विरूद्ध एकटा लढला आणि विजयाचा घास त्यांच्या घशातून काढून सामना 34-34 असा बरोबरीत सोडवत आपल्या संघाला आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पधेच्या बाद फेरीत स्थान मिळवून दिले.

मुंबई  -   देना बँकेचा नितीन देशमुख बलाढ्य महिंद्र आणि महिंद्र विरूद्ध एकटा लढला आणि विजयाचा घास त्यांच्या घशातून काढून सामना 34-34 असा बरोबरीत सोडवत आपल्या संघाला आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पधेच्या बाद फेरीत स्थान मिळवून दिले. देना बँक आणि महिंद्रला एकही विजय मिळविता आला नसला तरी कमी सरस गुणांच्या आधारे देना बँकेने गटात दुसरे स्थान मिळवत बाद फेरी गाठली तर महिंद्रचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. तसेच भारत पेट्रोलियम आणि महाराष्ट्र पोलीसांनी दोन्ही साखळी सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र एअर इंडियाला पहिल्याच सामन्यात हरवणाऱया मुंबई बंदरलाही सरस गुणांमध्ये मागे पडल्यामुळे बाद व्हावे लागले आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत मध्य रेल्वेची गाठ आयकराशी पडेल तर आर्मी विरूद्ध महाराष्ट्र पोलीस असे द्वंद्व रंगेल. पुण्याच्या बीईजीशी एअर इंडिया भिडेल तर देना बँकेला बलाढ्य भारत पेट्रोलियमशी लढावे लागणार आहे.

माहिम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर यांच्या पुढाकारामुळे प्रभादेवीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शिवसेना शाखा क्र. 194 यांनी संयुक्त आयोजित केलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या तिसऱया दिवशी कबड्डीप्रेमींना अंगावर शहारे आणणारा थरार अनुभवायला मिळाला. चारही सामने महत्त्वाचे असल्यामुळे प्रचंड संघर्ष आणि गुणांची रंगतदार चढाओढ पाहायला मिळाली. तिसऱया दिवशी कबड्डीप्रेमींची मनं जिंकली ती देना बँकेच्या नितीन देशमुखने. या धिप्पाड आणि भीमकाय देहयष्टीच्या खेळाडूने केलेल्या चढायांनी आजचा दिवस गाजवला. महिंद्रा आणि महिंद्र विरूद्ध देना बँक अशी लढत खऱया अर्थाने महिंद्र विरूद्ध देना बँक अशीच झाली. आघाडी - पिछाडीच्या रस्सीखेचीत कधी महिंद्र आघाडीवर होता तर कधी देना बँक. पण हा सामना पूर्णपणे महिंद्राच्या नियंत्रणात होता. सामन्याच्या प्रारंभीच ओमकार जाधव, स्वप्निल शिंदे आणि अजिंक्य पवार यांनी महिंद्र 10-5ves आघाडीवर होता. पण तेव्हाही नितीनने खोलवर चढाया करून दोन-दोन गुण मिळवत केवळ पिछाडीच भरून काढली नाही तर महिंद्रवर लोण चढवत मध्यंतराला 17-14 अशी आघाडीही मिळवून दिली.

मध्यंतरानंतर सामन्याला पुन्हा कलाटणी मिळाली. ओमकार जाधवच्या काही वेगवान चढायांनी 15-19 अशा पिछाडीवर असलेल्या महिंद्रला लोण चढवत 20-19 अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्या तीन मिनीटाच्या खेळात आणखी एक लोण चढवत महिंद्रची आघाडी 30-19 अशी वाढते. शेवटच्या पाच मिनीटात महिंद्रकडे 31-20 अशी 11गुणांची आघाडी होती. तेव्हा कुणीही डोळे झाकून सांगू शकतो की जिंकणार कोण. पण नितीन देशमुखच्या बाहुबलीसारख्या बलशाली चढायांनी पूर्ण सामनाच फिरवला. सलगच्या चढाईत दोनदा दोन-दोन गुण टिपत नितीनने महिंद्रावर लोण चढवून सर्वांच्या हृदयाचे ठोके वेगवान केले. शेवटची दोन मिनीटे असतानाही देना बँक 29-33 अशी मागे होती. महिंद्रला फक्त डोक्याने खेळायचे होते, पण नितीन देशमुखच्या खेळापुढे त्यांचे डोकेच सुन्नं झाले. देना बँकेकडून फक्त नितीनच चढाया करत होता. त्याने शेवटच्या दोन मिनीटातील पहिल्या दोन चढायांत एक गुण आणि एक बोनस मिळवत गुणफलक 31-33 असा केला. सामना संपायला अवघी 35 सेंकद होती. तेव्हा ओमकार जाधव चढाईवर एक गुण आणतो आणि महिंद्रचा स्कोर होतो 34-31. सामन्याची शेवटची चढाई करायला नितीन सरसावतो. अशा स्थितीत महिंद्रला शांत डोक्याने खेळण्याची गरज होती, पण नितीनच्या वेगवान खेळामुळे बधीर झालेल्या महिंद्रच्या खेळाडूंना काही सुचलेच नाही. आपल्याला पकडण्यासाठी पुढे आलेल्या स्वप्निल शिंदेला तो बाहेर फेकतो आणि त्यानंतर खोलवर चढाई करत डावा कोपरारक्षक ऋतूराज कोरवीला स्पर्श करतो. दुसऱया क्षणी नितीनला रोखण्यासाठी अजिंक्य पवार सरसावतो, पण नितीन झेप घेत रेषेला स्पर्श करतो आणि चढाईत तीन गडी बाद करून सामना बरोबरीत संपतो. पूर्ण सामना नितीन एकटा लढला आणि त्याने एकहाती संघाला बाद फेरीही गाठून दिली.

दुसऱया एका सामन्यात नाशिक आर्मी मोनू गोयत आणि महा निगमसारख्या खेळाडूंच्या उपस्थितीतही आघाडीनंतरही मागे पडतो. 19-16 ने आघाडीवर असलेल्या नाशिक आर्मीला एअर इंडियाच्या विकास काळेच्या सुसाट चढायांमुळे35-52 अशी हार सहन करावी लागली. पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करणाऱया एअर इंडियाने दुसऱया डावात आर्मीला तीनदा बाद करण्याचा पराक्रम केला. भारत पेट्रोलियमने सलग दुसरा विजय नोंदवताना नितीन मदनेच्या एकापेक्षा एक चढायांच्या जोरावर 24-19 अशी बाजी मारली. एअर इंडियाला आठ गुणांनी हरवणाऱया मुंबई बंदरला आर्मीविरूद्धचा 43-24 हा 19 गुणांचा पराभव महागात पडला. आता बाद फेरीत एअर इंडियासमोर बीईजीचे आव्हान असेल. दुसरीकडे महाराष्ट्र पोलीसांनीही सलग दुसरा विजय नोंदविताना बीईजीचा 37-31 असा पराभव केला. पोलीसांकडून महेश मकदूमने भन्नाट खेळ केला. या विजयात त्याला साथ लाभली ती बाजीराव होडगे, महेंद्र राजपूतची. बीईजीकडून राजकुमार आणि लुईस चांगले खेळले.

रिशांक आणि आर्मीसाठी टाळ्यांचा कडकडाट

आजच्या सामन्यांमध्ये निवेदक राणाप्रताप तिवारी यांच्या उत्साहवर्धक आणि स्फूर्तीदायक निवेदनाने कार्यक्रमात जान आणली. महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद मिळवून देणाऱया रिशांकच्या अंतिम सामन्यातील धडाकेबाज चढायांची चित्रफित दाखवल्यानंतर स्टेडियममध्ये एक मिनीट टाळ्यांचा कडकडाट होत होता. तसेच साडे तीन महिन्यांत एलफिन्स्टन-परळला रेल्वे स्थानकांना जोडणारा पुल बनविणाऱया आर्मीचेही प्रभादेवीकरांनी दिल खोलकर कौतुक केले. या कौतुक सोहळ्यावर राणाप्रताप तिवारी यांच्या दमदार आणि जोशपूर्ण निवेदनाने कळस चढवला.

टॅग्स :Kabaddiकबड्डीMumbaiमुंबई