Alligators engage in fight on golf course, fascinating video captured svg | OMG : गोल्फ ग्राऊंडवर मगरींचं युद्ध; Videoतील आवाज ऐकूनच सुटेल घाम 

OMG : गोल्फ ग्राऊंडवर मगरींचं युद्ध; Videoतील आवाज ऐकूनच सुटेल घाम 

दक्षिण कॅरोलिया येथील हार्डीव्हिले येथील हिल्टन हेड लेक गोल्फ कोर्सवर दोन मगरींच्या लढाईचा थरार रंगला. या अनपेक्षित पाहुण्यांचा हा थरार सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सडन डेथ प्लेऑफ 18, अशी या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आली आहे. मगरींचं हे भांडण गोल्फ कोर्सच्या 18व्या होलपाशी सुरू होते. व्हिडीओ शेअर करणाऱ्यानं लोकांना आपले डोळे उघडे ठेवा, असा सल्लाही दिला आहे.

15 सेकंदाच्या व्हिडीओत दोन मगरी एकमेकांशी लढाई करताना दिसत आहेत. दोघांपैकी एकानं दुसऱ्या मगरीचा जबडा तिच्या तोंडात पकडला आहे आणि एकमेकांना उताणी पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे वाईल्ड युद्ध पाहायला जेवढं भयानक वाटत होतं, तेवढाच त्यांचा आवाजही घाम फोडणारा आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 7.8 लाख लोकांनी पाहिला आहे आणि हा आकडा वाढतच आहे.

पाहा व्हिडीओ...   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीवर हूक किंवा पूल मारू शकत नव्हता; अख्तरनं सांगितला 2006चा किस्सा 

शोएब अख्तरच्या बाऊंसरवर घाबरला होता सचिन तेंडुलकर, बंद केले डोळे; पाकिस्तानी गोलंदाजाचा दावा

Happy Birthday Ravi Shastri: विराट कोहलीनं शास्त्री गुरुजींना म्हटलं शूर...

ICCचा मोठा दणका; BCCIला गमवावे लागेल 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद

ऑस्ट्रेलियातील ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2022पर्यंत स्थगित होणार?; ICCच्या सूत्रांची माहिती

... तर सहा महिन्यांत दोन वेळा होणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींची चांदी!

Web Title: Alligators engage in fight on golf course, fascinating video captured svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.