शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीवर सर्व अवलंबून

By admin | Updated: January 25, 2015 01:59 IST

टीम इंडियातील स्टार फलंदाज विराट कोहलीला आगामी वन-डे वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करावीच लागणार आहे़

राहुल द्रविड : आगामी वन-डे वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करावी लागणार आहेसिडनी : टीम इंडियातील स्टार फलंदाज विराट कोहलीला आगामी वन-डे वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करावीच लागणार आहे़ कारण, भारतीय संघाला त्याच्याकडून विशेष अपेक्षा आहेत, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केले आहे़ द्रविड म्हणाला, ‘‘जर भारतीय फलंदाज क्रमवारीवर एक नजर टाकल्यास विराटवर हा संघ अवलंबून असल्याचे दिसून येते़ विशेष म्हणजे, सध्या वन-डे सामन्यांमध्ये भारताच्या सलामीवीरांना विशेष चमक दाखविता आलेली नाही़ अशा परिस्थितीत मधली फळी कोहलीलाच सांभाळावी लागेल़’’ यानंतर सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी अखेरच्या काही षटकांत आक्रमक खेळ करण्यास सक्षम आहेत, असेही द्रविडने सांगितले़माजी कर्णधार द्रविड म्हणाला, ‘‘गोलंदाजीत अखेरच्या काही षटकांत भारतीय गोलंदाज कामगिरीत सातत्य राखू शकले नाहीत़ मोहंमद शमी, ईशांत शर्मा यांच्यात उत्कृष्ट गोलंदाजी करण्याची क्षमता आहे़; मात्र त्यांना त्याचा उपयोग करून घेता आलेला नाही़ तर, भुवनेश्वर उत्कृष्ट गोलंदाज आहे; मात्र त्यालाही अखेरच्या काही षटकांत गोलंदाजीवर नियंत्रण राखता आलेले नाही़ त्यामुळे वर्ल्डकपमध्ये त्यांना आपल्या गोलंदाजीत कमालीची सुधारणा करणे गरजेचे आहे़ (वृत्तसंस्था)भारत फलंदाजीच्या जोरावर जिंकू शकतोया वेळी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ आपला किताब कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे़ विशेष म्हणजे, भारतीय संघ फलंदाजीच्या जोरावर हा वर्ल्डकप जिंकू शकतो़ त्यासाठी कोहली, धोनी, शिखर धवन, सुरेश रैना, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांच्यासह इतर फलंदाजांनी आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडणे गरजेचे आहे़ईशांतचा ‘जलद’ सराव!सिडनी : भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने शुक्रवारी सिडनी क्रिकेट मैदानावर कसून सराव केला. सरावादरम्यान जलद माऱ्यावर भर दिला. जलद मारा आणि चेंडू पकडण्याची योग्य पद्धत यामुळे तो पुनरागमन करेल, असा विश्वास भारतीय व्यवस्थापकांना आहे. दुसरी समाधानाची बाब म्हणजे, संघाचे तांत्रिक संचालक रवी शास्त्री आॅस्ट्रेलियात संघाशी जुळले असून त्यांनी खेळाडूंशी संवादही साधला. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांवेळी शास्त्री भारतात होते. ईशांत आणि शास्त्री यांच्या आगमनामुळे संघाला प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे. भारताचा तिसरा सामना सोमवारी म्हणजे प्रजासत्ताकदिनी होत आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी ‘आॅस्ट्रेलिया डे’ असल्याने येथे राष्ट्रीय सुटी आहे. त्यामुळे या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी मैदानावर गर्दी करतील. सराव सत्रात विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. आश्विन मात्र सहभागी झाले नाहीत. ब्रिस्बेन येथील सामन्यादरम्यान रोहितला ‘हॅमस्ट्रिंग’चा त्रास सुरू झाला होता.