त्यानंतर भारत फॉर्ममध्ये परतेल : किरण मोरे
By Admin | Updated: February 11, 2015 01:39 IST2015-02-11T01:39:56+5:302015-02-11T01:39:56+5:30
आगामी वन-डे वर्ल्डकपमधील पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली, तर टीम इंडिया पुन्हा फॉर्ममध्ये येईल

त्यानंतर भारत फॉर्ममध्ये परतेल : किरण मोरे
नवी दिल्ली : आगामी वन-डे वर्ल्डकपमधील पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली, तर टीम इंडिया पुन्हा फॉर्ममध्ये येईल, असे मत माजी यष्टिरक्षक किरण मोरे यांनी व्यक्त केले आहे़
नुकत्याच झालेल्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला एकही कसोटी सामना जिंकता आला नव्हता़ तसेच, वन-डेतही भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते़
मोरे यांनी पुढे सांगितले, की अशा महत्त्वाच्या स्पर्धेत नशिबाची साथसुद्धा गरजेची आहे़ अशा परिस्थितीत पाकला पराभूत केले, तर टीम इंडियातील खेळाडूंचा आत्मविश्वास उंचाविण्यास मदत होईल़ याच बळावर संघ स्पर्धेतील पुढच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरेल, यात शंका नाही़ मोरे पुढे म्हणाले, की वर्ल्डकपमधील भारताचा हा सर्वोत्कृष्ट संघ आहे़ मात्र, त्यांच्यात केवळ आत्मविश्वासाची कमतरता आहे़ तसेच, संघातील अनेक खेळाडू आऊट आॅफ फॉर्म आहेत़ अशा वेळी एका विजयामुळे संघ स्पर्धेत मुसंडी मारू शकतो़ (वृत्तसंस्था)