शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! वडिलांच्या निधनानंतर लेकीचाही मृत्यू; आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली गोऱ्हेंचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 09:21 IST

मोनाली यांनी प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ आणि माजी पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचे प्राथमिक शिक्षण घेतले होते.

नाशिक : नाशिकच्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली मनोहर गोऱ्हे (४४) यांचे गुरुवारी (दि. २०) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यापूर्वी केवळ काही तास आधी पहाटे मोनालीचे वडील मनोहर गोऱ्हे (७३) यांचेदेखील निधन झाले होते. वडिलांपाठाेपाठ मुलीचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मोनाली यांनी प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ आणि माजी पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचे प्राथमिक शिक्षण घेतले होते. त्यानंतर स्वकर्तृत्वावर राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवल्यानंतर त्यांनी सातपूरला एक्सेल शुटिंग नावाने नेमबाजी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. गत दशकभराहून अधिक काळापासून मोनाली त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत नाशिकच्या युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम करत होत्या. दरम्यानच्या काळात मोनाली यांनी प्रशिक्षक म्हणून भारताच्या युवा संघासमवेत अनेक स्पर्धांमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कर्तव्य पार पाडले होते. तसेच गत पाच वर्षांपासून त्या श्रीलंकेच्या संघालादेखील प्रशिक्षण देत होत्या. आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक म्हणूनदेखील त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले होते. त्यांच्या पश्चात आई आणि एक विवाहित बहीण आहे.

वडिलांचे पहाटे निधनमोनालीचे वडील आणि जिल्हा परिषदेचे माजी कर्मचारी मनोहर गोऱ्हे यांचे पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. इंदिरानगरच्या जिल्हा परिषद कॉलनीतील रहिवासी आणि श्री दत्तगुरु सेवा संस्थानचे उपाध्यक्ष असलेल्या गोऱ्हे यांचा सामाजिक कार्यातही पुढाकार होता. वडिलांपाठोपाठ कन्या मोनालीचेही निधन झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.