आॅलिम्पिकमधून बॉक्सिंग वगळल्यास कारवाई, ‘एआयबीए’चा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 04:59 AM2019-05-08T04:59:16+5:302019-05-08T05:00:34+5:30

आम्ही आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या सूचनेनुसार बदल केलेले आहेत; पण जर टोकियोमध्ये होणाऱ्या २०२० आॅलिम्पिकमध्ये बॉक्सिंगला स्थान मिळाले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल

Action, if left out of the Olympic Boxing, will be indicated by AIBA | आॅलिम्पिकमधून बॉक्सिंग वगळल्यास कारवाई, ‘एआयबीए’चा इशारा

आॅलिम्पिकमधून बॉक्सिंग वगळल्यास कारवाई, ‘एआयबीए’चा इशारा

Next


गोल्ड कोस्ट : आम्ही आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या सूचनेनुसार बदल केलेले आहेत; पण जर टोकियोमध्ये होणाऱ्या २०२० आॅलिम्पिकमध्ये बॉक्सिंगला स्थान मिळाले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वादात अडकलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) मंगळवारी दिला आहे.
आयओसीने पुढील वर्षी होणाºया आॅलिम्पिकसाठी या खेळाची तयारी थांबविली होती. कारण २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकमध्ये बाऊट फिक्सिंगचे आरोप झाले होते आणि आयओएने एआयबीएकडे या आरोपावर तोडगा काढण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात आल्याचे पुरावे मागितले होते.
टोकियो २०२० मध्ये बॉक्सिंगच्या समावेशाबाबत २२ मे रोजी निर्णय होणार आहे. या स्पर्धेत बॉक्सिंगला स्थान मिळाले नाही, तर पुढील आॅलिम्पिकमध्ये याचा समावेश असावा, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आयओसीने स्पष्ट केले.
एआयबीएने एएफपीला पाठविलेल्या उत्तरामध्ये म्हटले आहे की, ‘टोकियोमध्ये या खेळाच्या आयोजनासाठी खेळाचा बचाव करण्याच्या वैध अधिकाराचा वापर करू.
आयओसीने आॅलिम्पिक
चार्टरचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्व पर्यायांचा विचार करू. त्यात कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचाही समावेश आहे.’
एआयबीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम विर्जेट््स म्हणाले
की, त्यांनी आयओसीने सुचविलेल्या सर्व सूचनांचे पालन केले आहे.
एक संघटना म्हणून आम्ही सुचविलेले सर्व बदल केले आहेत, असेही
ते म्हणाले.

Web Title: Action, if left out of the Olympic Boxing, will be indicated by AIBA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.