शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई स्पर्धेतून अभिनवचा ‘कांस्य’ निरोप

By admin | Updated: September 24, 2014 04:06 IST

आॅलिम्पिक या क्रीडाक्षेत्रातील जागतिक कुंभमेळ्यात भारताला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणा-या अभिनव बिंद्राच्या आशियाई स्पर्धेतील कारकिर्दीची अखेर कांस्यपदकाने झाली

इंचियोन : आॅलिम्पिक या क्रीडाक्षेत्रातील जागतिक कुंभमेळ्यात भारताला पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणा-या अभिनव बिंद्राच्या आशियाई स्पर्धेतील कारकिर्दीची अखेर कांस्यपदकाने झाली. आज त्याला पुरुषांच्या १० मीटर एयर रायफलमध्ये वैयक्तिक गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अभिनवकडून या प्रकारात सुवर्णपदकाची अपेक्षा होती. ती पूर्ण झाली नसली तरी कारकिर्दीतील अखेरच्या एशियाडमध्ये अभिनवच्या दृष्टीने एक गोष्ट किमान चांगली घडली... ती म्हणजे, आज मिळवलेले कांस्यपदक हे त्याच्या कारकिर्दीतील पहिले वैयक्तिक एशियाडपदक ठरले. ३१ वर्षीय अभिनवने १८७.१ असा स्कोअर केला. चीनचा १८ वर्षीय प्रतिभावान खेळाडू यांग हाओरन याने २०९.६ गुणांसह सुवर्णवेध घेतला. त्याने आपलाच संघसहकारी असलेल्या विश्वविजेता आणि वर्तमान आशियाई चॅम्पियन काओ यीफेई याला मागे टाकून आजचा दिवस गाजवला. यीफेईने २०८.९ गुणांसह रौप्यपदक मिळवले. करिअरमधील अखेरच्या एशियाडमध्ये कांस्य जिंकून अभिनवने या स्पर्धेतील आपली निवृत्ती अविस्मरणीय केली. अभिनवने अखेरच्या प्रयत्नात १०.५ गुण मिळवले, तेव्हा कांस्यपदकाने हुलकावणी दिल्याची भावना झाल्याने तो बराच वेळ निराशपणे मान खाली घालून उभा राहिला. कारण, अटीतटीच्या क्षणी एक दशांशाचा फरकदेखील निर्णायक ठरू शकतो, याची जाणीव त्याला होती. मात्र, इराणच्या नेमबाजाला अखेरच्या प्रयत्नात ९.६ गुणच मिळवणे शक्य झाल्याने अभिनवने मोठा नि:श्वास टाकला... अशा तऱ्हेने अखेर या स्पर्धेतील पहिले वैयक्तिक पदक त्याच्या खात्यावर जमा झाले.(वृत्तसंस्था)