शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

Hockey World Cup: 4 वेळचा विश्वविजेता पाकिस्तान यंदाच्या हॉकी वर्ल्ड कपमधून बाहेर; जाणून घ्या कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 12:44 PM

Men's Hockey World Cup 2023: पुरुष हॉकी विश्वचषकात भारतीय संघ आपला सलामीचा सामना आज स्पेनविरूद्ध खेळणार आहे. 

नवी दिल्ली : पुरुष हॉकी विश्वचषक 2023 ला आजपासून सुरूवात होत आहे. यजमान भारतीय संघाचा सलामीचा सामना स्पेनशी होणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नव्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. खरं तर भारतीय संघ यावेळी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, मेन इन ब्ल्यूने या स्पर्धेत मागील 48 वर्षांपासून एकही किताब जिंकला नाही. अशा स्थितीत भारतीय चाहत्यांना टीम इंडियाकडून किताब जिंकण्याची अपेक्षा आहे. भारत आणि स्पेन यांच्यातील सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

दरम्यान, हॉकी विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी ठरलेला पाकिस्तानचा संघ यंदाचा विश्वचषक खेळणार नाही. खरं तर पाकिस्तानच्या संघाने 4 वेळा विश्वचषकाचा किताब पटकावला आहे. मात्र, यंदाच्या विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यात शेजाऱ्यांना अपयश आले. यंदाच्या विश्वचषकाच्या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत, परंतु भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ पाकिस्तान या स्पर्धेत सहभागी झाला नाही. 

पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर हॉकी विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानकडे सर्वाधिक चार जेतेपदे आहेत. असे असूनही पाकिस्तान यंदाच्या विश्वचषकात स्थान मिळवू शकला नाही. मेगा इव्हेंटमध्ये पाकिस्तानची अनुपस्थिती सीमेच्या दोन्ही बाजूंच्या हॉकी चाहत्यांसाठी धक्कादायक ठरली आहे. कारण भारत आणि पाकिस्तानने सात दशकांहून अधिक काळ एकमेकांविरुद्ध अनेक प्रतिष्ठित सामने खेळले आहेत. हॉकी विश्वचषक 2023 मध्ये जागा मिळवण्यासाठी पाकिस्तानला 2022 आशिया चषकातील पहिल्या चारमध्ये स्थान मिळणे आवश्यक होते. मात्र, ते दुसरी फेरी गाठण्यात अपयशी ठरले, ज्यामुळे ते 2023 हॉकी विश्वचषकाचा भाग होऊ शकले नाहीत. लक्षणीय बाब म्हणजे पाकिस्तान हॉकी वर्ल्ड कपमध्ये सहभागी न होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2014 च्या विश्वचषकातही शेजाऱ्यांना विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नव्हती.  

पहिल्या दिवशी होणार 4 सामनेस्पर्धेतील पहिला सामना भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगणार आहे. दुसरीकडे दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ पूल-अ च्या फ्रान्सशी भिडणार आहे. त्यानंतरचा सामना 21000 प्रेक्षकांची क्षमता असलेल्या बिरसा मुंडा स्टेडियमवर इंग्लंड आणि वेल्स यांच्यात होईल. नंतर दिवसातील शेवटचा सामना भारत आणि स्पेन यांच्यात होईल. कलिंगा स्टेडियमवर या स्पर्धेतील 24 सामने आणि बिरसा मुंडा स्टेडियमवर 20 सामने खेळवले जाणार आहेत.

विश्वचषकासाठी भारतीय संघ - 

  • गोलरक्षक - कृष्ण बहादूर पाठक, पीआर श्रीजेश
  • बचावपटू - जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), नीलम संजीप
  • मिडफिल्डर - मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग
  • फॉरवर्ड्स - मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजीत सिंग
  • पर्यायी खेळाडू - राजकुमार पाल, जुगराज सिंग 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानHockeyहॉकीHockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धा