शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा: जिम्नॅस्टिक्समध्ये 'सुवर्ण षटकार'! पदक तालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 08:26 IST

38th National Games : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले

डेहराडून : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राने सहा सुवर्ण जिंकून ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा १५वा दिवस गाजविला. अक्रोबॅटिक प्रकारात चार सुवर्णपदकांसह एक रौप्य, अशी पाच पदकांची लयलूट केली. पाठोपाठ रि‌मिक्समध्ये सांधिक सुवर्ण व ट्रॅम्पोलिन वैयक्तिक प्रकारात एक सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली. या यशाने ३८ सुवर्णांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आला आहे. रिदमिक्समध्ये संयुक्ता काळे, किमया कार्ले, परिणा मदनपोत्रा व शुभश्री मोरे या महिला चौकडीने सोनेरी यश मिळवून दिले. छत्रपती संभाजीनगरच्या आयुष मुळे याने सर्वाधिक गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला सुवर्ण जिंकून दिले.

अक्रोबॅटिकमध्ये ऋतुजा जगदाळे व निक्षिता खिल्लारे जोडीने सुवर्ण जिंकले. मिश्र दुहेरीत शुभम सरकटे व रिद्धी जैस्वाल जोडीने सुवर्ण तर पुरुष सांधिक गटात प्रशांत गोरे, नमन महावर, रितेश बोराडे, यझेश भोस्तेकर यांनी तिसरे सुवर्ण पदक जिंकून दिले. महिला सांधिकमध्ये अक्षता ढोकळे, अर्णा पाटील व सोनाली बोराटे या त्रिमूर्तीनी अक्रोबॅटिकमधील चौथे सुवर्ण जिंकले. गणेश पवार व आदित्य काळकुंद्रे यांनी रुपेरी यश मिळविले.

टेटेमध्ये रौप्यवर समाधान

टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू बंगालकडून ०-३ असे पराभूत झाल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जश मोदी याला अनिर्बन घोषकडून ७-११, १२-१०, ११-६, ४-११ ने पराभव पत्करावा लागला. रेगन अल्बुकर्क याला आकाश पाल याने ११-५,११-८, १२-१० असे सहज हरविले. चिन्मय सोमय्या याला सौरव शाह याने ११-७, ११-८, ८-११, ११-८ असे पराभूत करीत बंगालच्या विजेतेपदावर मोहोर उमटवली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र