विराट कोहलीपेक्षा 22 पट 'त्याने' एकाचवेळी कमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 16:15 IST2018-10-19T16:13:42+5:302018-10-19T16:15:24+5:30

एका खेळाडूने केलेल्या करारामध्ये त्याला एवढी रक्कम मिळाली आहे की तुम्ही ऐकून चकित व्हाल. कोहलीपेक्षा तब्बल 22 पट जास्त रक्कम या खेळाडूने फक्त एका करारामध्ये मिळवली आहे.

22 times 'Virat Kohli' he earned at the one time | विराट कोहलीपेक्षा 22 पट 'त्याने' एकाचवेळी कमावले

विराट कोहलीपेक्षा 22 पट 'त्याने' एकाचवेळी कमावले

ठळक मुद्देआतापर्यंत बरेच मोठे करार नामवंत खेळाडूने केले आहेत. पण हा करार मात्र ऐतिहासिक असल्याचे म्हटले जात आहे.

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली हा सर्वात महागडा खेळाडू असल्याचे बोलले जात आहे. कारण सध्या कोहली एवढ्या फॉर्मात असलेला दुसरा फलंदाज दिसत नाही. त्यामुळे बऱ्याच जाहीराती आणि करार कोहलीने केले आहेत. पण एका खेळाडूने केलेल्या करारामध्ये त्याला एवढी रक्कम मिळाली आहे की तुम्ही ऐकून चकित व्हाल. कोहलीपेक्षा तब्बल 22 पट जास्त रक्कम या खेळाडूने फक्त एका करारामध्ये मिळवली आहे.

आतापर्यंत बरेच मोठे करार नामवंत खेळाडूने केले आहेत. पण हा करार मात्र ऐतिहासिक असल्याचे म्हटले जात आहे. कारण हा करार झाला आहे तब्बल 2659 कोटी रुपयांचा. आणि हा करार करणारा आहे एक बॉक्सर.

 

मॅक्सिकोचा बॉक्सर साऊल कॅनेलो अलव्हारेझने आपण केलेल्या एका कराराबद्दल नुकताच खुलास केला आहे. डॅन्झ या कंपनीबरोबर त्याने एक करार केला असून यासाठी त्याने 2659 कोटी (365 मिलियन डॉलर) रुपये वसूल केले आहेत. यापूर्वी सर्वाधिक रक्कमेचा करार 2014 साली झाला असे म्हटले जाते. 2014 साली अमेरिकेचा बेसबॉलपटू गिआनकार्लो स्टॅन्टोनने 325 मिलियन डॉलरचा करार केला होता.

Web Title: 22 times 'Virat Kohli' he earned at the one time