शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

2028 च्या ऑलिम्पिक यजमानपदाचा मान लॉस एंजलिसकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 00:21 IST

पॅरिस आणि लॉस एंजलिस या शहराच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर सामजंस्याने घेतलेल्या निर्णयामुळे आता ऑलिम्पिक २०२४ पॅरिस, तर २०२८ मध्ये लॉस एंजलिसला होईल.

लॉस एंजलिस दि. 14 - 2016 साली ब्राझीलच्या रिओ दी जनेरो या शहरात झालेल्या ऑलिम्पिकनंतर आगामी ऑलिम्पिक खेळांचा मान जपानच्या टोकीयो शहराला मिळाला आहे. यानंतर आगामी दोन ऑलिम्पिक खेळांचं यजमानपद कोणत्या शहराला मिळणारं याची सर्वांमध्येच उत्सुकता होती, त्यावर अखेर आज पडदा पडलेला आहे. 100 वर्षानंतर पुन्हा एकदा 2024 मध्ये पॅरिसमध्ये ऑलिम्पीक स्पर्धा होणार आहे. तर आज अखेर 2028 सालचे ऑलिम्पीक खेळ कोणत्या शहरात रंगणार यावरचा पडदा आता उठलेला आहे. अमेरिकेतल्या लॉस एंजलिस या शहराला 2028 च्या ऑलिम्पीक खेळाचं यजमानपद भूषवण्याचा मान मिळाला आहे. आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं आज याची घोषणा केली.

ऑलिम्पिक खेळ आपल्या शहरात होणे ही कोणत्याही शहरासाठी अभिमानाची अशी गोष्ट आहेच, त्यासाठी जगभरातील शहरांमध्ये चुरस लागते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने जेव्हा 2020 च्या उन्हाळी ऑलिम्पिकसाठी शहरांची यादी मागवली त्यात बड्या बड्या शहरांचा समावेश होता, पण टोकियोने इस्तंबूल आणि माद्रिदला मागे सारत स्वत: यजमान पद पटकाविले.पॅरिस आणि लॉस एंजलिस या दोन्ही शहरांनी 2024 च्या ऑलिंपिक स्पर्धेच्या यजमानपदाची तयारी दर्शविली होती. गेल्यावर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या छाननीनंतरच ही दोन नावे शर्यतीत राहिली होती. त्या वेळी बोस्टन, हॅम्बुर्ग, रोम आणि बुडापेस्ट या शहरांनी वाढता खर्च आणि जनतेकडून असणारा विरोध लक्षात घेऊन यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. यावर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीपूर्वी दोन्ही शहरांनी आपापसात चर्चा करून कुणी प्रथम ऑलिंपिकचे आयोजन करायचे याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन ऑलिंपिक समितीने केले होते. यजमानपदासाठी संभाव्य मतदान आणि त्यानंतरचे मतभेद टाळण्यासाठी हा सगळा प्रयत्न होता. ऑलिंपिक समितीच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. लॉस एंजलिसने 2024च्या यजमानपदाचा हट्ट सोडून 2028मध्ये आयोजन करण्याची तयारी दर्शविली आणि हा सगळा प्रश्‍न सुटला. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.आगामी ऑलिम्पिक खेळांच्या तयारीसाठी दोन्ही शहरांना आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती 1.8 दशलक्ष डॉलरचा निधी देणार आहे. या निधीमध्ये आगामी काळात गरजेनूसार 2 दशलक्ष डॉलरची वाढही केली जाऊ शकते.