किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर विजयासाठी 165 धावांचं लक्ष्य
By Admin | Updated: May 4, 2016 21:49 IST2016-05-04T21:38:38+5:302016-05-04T21:49:39+5:30
कोलकाता नाइट रायडर्सनं निर्धारित 20 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या आहेत
किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर विजयासाठी 165 धावांचं लक्ष्य
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 4 : कोलकाता नाइट रायडर्सनं निर्धारित 20 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर केकेआरनं 165 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. उथप्पा आणि कर्णधार गौतम गंभीरने दमदार सलामी दिली. १३.३ षटकात १०१ धावांच्या सलामीनंतर गंभीर बाद झाला. गंभीरने ४५ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. तर उथप्पानं 49 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकार लगावून झटपट 70 धावा केल्या . पठाननं नाबाद खेळत 1 चौकार लगावत 19 धावा केल्या आहेत. रसेलने 1 चौकार आणि 1 षटकार लगावत 16 धावा कुटल्या आहेत. पंजाबकडून एकाही गोलंदाजालां विकेट मिळवता आली नाही. केकेआरचे तिन्ही फलंदाज धावबाद झाले.