Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:10 IST2025-08-26T13:09:29+5:302025-08-26T13:10:38+5:30
Youth World Archery Championship: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं युवा जागतिक तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले.

Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
महाराष्ट्राची १६ वर्षीय तिरंदाज शर्वरी सोमनाथ शेंडे हिने कॅनडातील विनिपेग येथे झालेल्या युवा जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विजयानंतर राज्याचे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे शर्वरीचे अभिनंदन केले. तसेच तिच्या सुवर्ण कामगिरीचे, दृढनिश्चयाचे आणि कौशल्याचे कौतुक केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने मंत्री कोकाटे यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले. कोकाटे म्हणाले की, "शर्वरी यांनी कोरियाला तब्बल दोन वेळा हरवत सेमीफायनल्स आणि फायनल शूटरॉफ्स मध्ये अंडर-१८ रीकर्व वर्ल्ड यूथ आर्चरी सुवर्ण पदक भारतासाठी जिंकले आहे. अंडर-१८ रीकर्व वर्ल्ड यूथ आर्चरीमध्ये केलेले हे अभूतपूर्व यश त्यांच्या धैर्याचे, चिकाटीचे आणि खेळाविषयी असलेल्या प्रचंड प्रेमाचे उदाहरण आहे. शर्वरी, आपल्या या अद्वितीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा."
आपल्या महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडे ने रचला इतिहास !
— Manikrao Shivajirao Kokate (@kokate_manikrao) August 25, 2025
शर्वरी यांनी कोरियाला तब्बल दोन वेळा हरवत सेमीफायनल्स आणि फायनल शूटरॉफ्स मध्ये U18 रीकर्व वर्ल्ड यूथ आर्चरी सुवर्ण पदक भारतासाठी जिंकले आहे.
U18 रीकर्व वर्ल्ड यूथ आर्चरीमध्ये केलेले हे अभूतपूर्व यश त्यांच्या धैर्याचे,… pic.twitter.com/aNMfSSjSEc