भारतीय संघात महाराष्ट्राचे 11 खेळाडू
By Admin | Updated: November 11, 2014 02:10 IST2014-11-11T02:10:01+5:302014-11-11T02:10:01+5:30
डिसेंबर महिन्यात पार पडणा:या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय निवड स्पर्धेत महाराष्ट्राचा ङोंडा फडकला.

भारतीय संघात महाराष्ट्राचे 11 खेळाडू
मुंबई : डिसेंबर महिन्यात पार पडणा:या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय निवड स्पर्धेत महाराष्ट्राचा ङोंडा फडकला. तब्बल 11 खेळाडूंनी राष्ट्रीय संघामध्ये आपली जागा निश्चित करताना एकहाती वर्चस्व राखले.
वडोदरा येथे इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या वतीने पार पडलेल्या या स्पर्धेत भारताच्या प्रत्येकी 43 खेळाडूंच्या दोन संघांची निवड करण्यात आली. महाराष्ट्राच्या संग्राम चौगुले, सुनीत जाधव, स्वप्निल नरवडकर, बी. महेश्वरन या खेळाडूंकडे विशेष लक्ष असेल. महिला गटामध्ये पश्चिम बंगालच्या सिबलिका साह आणि सरिता थिंगबैजम (मणिपूर) यांनी अनपेक्षित कामगिरी करताना रबितादेवी व ममतादेवी यांना मागे टाकले.
मुख्य गट (पुरुष):
55 किलो : अरुण दास (भारतीय नौदल), अमित मेहरा (पंजाब); 6क् किलो : अनुप दास (रेल्वे), स्वप्निल नरवडकर (महाराष्ट्र), नितीन म्हात्रे (महाराष्ट्र), इंद्रनील मैती (प. बंगाल); 65 किलो : रोमी सिंग (भारतीय नौदल), शिवकुमार (रेल्वे), जयकुमार (भारतीय नौदल), राजू खान (दिल्ली), पंकज प्रतिहारी (ओरिसा); 7क् किलो : बी. महेश्वरन (महाराष्ट्र), रॉबी मैतेयी (आसाम), नीरजकुमार (दिल्ली), अनिल गोछीकर (ओरिसा), सुशीलकुमार (पंजाब); 75 किलो : यतिंदर सिंग (उत्तर प्रदेश), बॉबी सिंग (रेल्वे), सागर कातुर्डे (महाराष्ट्र), पी. तमिलानबन (भारतीय नौदल), विनीत मारवाह (पंजाब); 8क् किलो : विपीन पीटर (भारतीय नौदल), विजय बहादूर (रेल्वे), सुनीत जाधव (महाराष्ट्र), आशिष साखरकर (महाराष्ट्र).
भारत किमान 15 पदके पटकावेल - पाठारे
च्डिसेंबर महिन्यात रंगणारी जागतिक स्पर्धा एकूण 28 गटांमध्ये पार पडणार असून, भारतीय संघ किमान 15 पदके पटकावेल, असा विश्वास आयबीबीएफचे जनरल सेक्रेटरी चेतन पाठारे यांनी व्यक्त केला आहे. तसेच आतार्पयतचा हा भारतीय संघ सर्वात तगडा असून, निश्चितच या वेळी देशाला मोठे यश मिळेल, असेही पाठारे यांनी सांगितले.