शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांचे हस्तांतरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:43 IST

पनवेल महानगरपालिकेत समावेश करण्यात आलेल्या २९ महसुली गावातील एकूण ५१ जिल्हा परिषदेच्या शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव

- अरुणकुमार मेहत्रे । लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महानगरपालिकेत समावेश करण्यात आलेल्या २९ महसुली गावातील एकूण ५१ जिल्हा परिषदेच्या शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव पडून आहे. त्यामुळे जवळपास साडेसहा हजार विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच पावणेतीनशे शिक्षक संभ्रमात आहेत. या सर्व शाळा महापालिकेकडे वर्ग होणार आहेत, परंतु या कार्यवाहीला किती वेळ लागेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेत वर्ग झाल्यावर शाळांना अतिरिक्त निधी तसेच उत्तम पायाभूत सुविधा मिळतील, असा विश्वास ग्रामस्थांना आहे. गतवर्षी १ आॅक्टोबर रोजी पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतर सिडको, ग्रामपंचायतीच्या ताब्यातील वसाहती हस्तांतरित करण्याची प्रक्रि या सुरू झाली आहे. त्याशिवाय ग्रामपंचायती बरखास्त करून त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून कामकाज सुरू करण्यात आले. पनवेल महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २९ गावांमधील आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या ५१ शाळा असून त्याचेही महापालिकेकडे हस्तांतरण होणे अपेक्षित आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही हालचाली होत नसल्याने शाळेतील विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकवर्ग संभ्रमात आहेत. पनवेल नगरपालिकेच्या एकूण अकरा शाळा होत्या ज्या महापालिकेकडे वर्ग झाल्या आहेत. शाळा हस्तांतरणाबाबत आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी महापालिका स्थापनेच्या सुरुवातीलाच तालुका गटशिक्षण कार्यालयाकडून याबाबत माहिती मागितली होती. तसेच या विषयी अधिकाऱ्यांबरोबर चर्चाही केली होती. शिक्षण विभागाने शाळांची संख्या विद्यार्थी व शिक्षकांची आकडेवारी लेखी स्वरूपात महापालिकेला दिली होती. परंतु त्यानंतरही अद्याप शाळा हस्तांतरणाबाबत हालचाली दिसत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही काळ जिल्हा परिषदेतच शाळांचा समावेश पनवेल महापालिका क्षेत्रात येणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे त्वरित वर्ग होणे सध्या तरी शक्य नाही. याचे कारण महापालिका प्रशासनाकडे पुरेसा निधी नाही. तसेच शाळांकडूनही कोणत्याही स्वरूपात उत्पन्न मिळणार नसून उलट शिक्षकांचे वेतन व इतर गोष्टींवर मोठा खर्च करावा लागणार आहे. ही बाब महापालिका प्रशासनाला आजघडीला शक्य नाही. त्यामुळे काही काळासाठी या शाळा रायगड जिल्हा परिषदेकडेच ठेवाव्या लागणार आहेत.पनवेल महापालिकेकडून सुरुवातीला आमच्याकडे माहिती मागितली होती. त्यानुसार त्यांच्या हद्दीत येणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांची आकेडवारी व इतर माहिती त्यांना सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाकडून आमच्या कार्यालयाकडे कोणताही पत्रव्यवहार झाला नाही किंवा विचारणाही झालेली नाही. - नवनाथ साबळे, गटशिक्षण अधिकारी, पनवेल तालुका