पनवेल : पनवेल रेल्वे स्थानकावर गुरुवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी महिलेने एका मुलीला जन्म दिल्याची घटना घडली. प्रसूती झालेली महिला व बाळ दोघेही सुखरूप आहेत.पनवेल ते नेरूळ प्रवासादरम्यान मनीषा या महिलेला प्रसूती वेदना झाल्यावर ती खांदेश्वर रेल्वे स्टेशनवर उतरली. या वेळी डॉक्टरकडे जाण्यासाठी पुन्हा खांदेश्वर ते पनवेल दरम्यान प्रवास करत असताना मोठ्या प्रमाणात वेदना झाल्यावर पनवेलचे स्टेशन मास्तर एस. एम. नायर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या एक रुपये क्लिनिक उपक्रमाचे डॉ. विशाल वाणी यांना कळवले. डॉक्टरांनीमहिला व नवजात बालकाची तपासणी केल्यावर दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले.
पनवेल रेल्वे स्थानकावर झाली महिलेची प्रसूती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 03:22 IST