नवी मुंबई - भटक्या कुत्र्यांच्या हल्यात महिला गंभीर जखमी झाल्याचा प्रकार सानपाडा येथे घडला आहे. पहाटेच्या वेळी मोराज सोसायटीत दबा धरुन बसलेल्या कुत्र्यांनी या महिलेवर हल्ला केला. तर अचानकपने कुत्र्यांकडून झालेल्या हल्यात महिला खाली कोसळल्यानंतर देखिल कुत्र्यांकडून तिच्या शरीराचे लचके तोडले जात होते. या प्रकारामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.सानपाडा येथील मोराज रेसीडेंसी या सोसायटीत शनिवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी राहणारया प्रेमा सिंग ह्या कामानिमित्ताने घराबाहेर निघाल्या होत्या. यावेळी त्या जिन्यावरुन खाली उतरत असतानाच त्याठिकाणी दबा धरुन बसलेल्या दोन कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामद्ये त्या खाली कोसळल्या असता, दोन्ही कुत्र्यांनी त्यांच्या शरीराचे लचके तोडण्यास सुरवात केली. त्यांनी या कुत्र्यांपासून स्वतची सुटका करुन घेण्याचा प्रयlत्न करुन देखिल कुत्र्यांकडून चावा घेतलाच जात होता. यामुळे काही वेळातच त्या गंभीर जखमी होवून रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळीच कोसळल्या. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिथल्या नागरीकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, प्रेमा सिंग यांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांनी सोसायटीत प्रवेश करुन केलेल्या या हल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे.
कुत्र्यांच्या हल्यात महिला गंभीर जखमी, सानपाडा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 22:25 IST