शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 03:13 IST

अंधेरी लोखंडवाला परिसरातील घटना : दोन हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

मुंबई : त्वचा तज्ज्ञ महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार रविवारी अंधेरीत घडला. या हल्ल्यामागचे कारण अद्यापअस्पष्ट असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक चौकशी करत आहेत. नसरीन खान (४०) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांचे अंधेरीतील ओशिवरा मार्केट परिसरात क्लिनिक आहे. खान या रविवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या क्लिनिकमध्ये एका रुग्णावर उपचार करत होत्या. त्यादरम्यान हेल्मेट घातलेले दोन इसम त्यांच्या क्लिनिकमध्ये दाखल झाले.

त्यांनी क्लिनिकमधील कर्मचाऱ्याला आवाज देत खान यांना बोलविण्यास सांगितले. काही वेळाने खान बाहेर आल्या. तेव्हा त्या अनोळखी इसमाने त्यांच्या मानेवर तलवार ठेवली तर दुसºयाने चॉपर आणि चाकूने त्यांच्या चेहºयावर अनेक वार केले. त्यानंतर ते मोटारसायकलवर बसून पसार झाले. डॉक्टरने आरडाओरड केली. मात्र गजबजलेल्या परिसरातही हल्लेखोरांना पकडण्याची हिंमत कोणीच केली नाही. या घटनेनंतर खान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी खान यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखलकेली आहे.सीसीटीव्ही फूटेजची पडताळणीयासंदर्भात अधिक माहिती देताना तपास अधिकाºयांनी सांगितले की, क्लिनिक तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी करण्यात येत असून दोन्ही हल्लेखोरांनी डोक्यात हेल्मेट परिधान केल्याने त्यांचे चेहरे ओळखण्यात अडथळा येत आहे.च्अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस