शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील 19 मार्गांवर जलवाहतूक होणार सुसाट, रुंदीकरण-खोलीकरणास मुदतवाढ; मेरिटाइम बोर्डास दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2023 07:53 IST

- नारायण जाधव लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : सागरमाला प्रकल्पाअंतर्गत बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सुरू झालेली असताना ...

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सागरमाला प्रकल्पाअंतर्गत बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक सुरू झालेली असताना आता मुंंबई महानगर प्रदेशातील सात महानगरांसह कोकणातील १९ मार्गांवर प्रवाशांसह रो-रो पॅक्सद्वारे मालवाहतूक सुरू करण्यात येणार आहे. मात्र, यातील बहुतांश  मार्ग खडकाळ असून, अनेक ठिकाणी रेतीसह दलदल- सागरी चिखल साचला आहे. तो काढून या मार्गांच्या खाेलीकरणासह त्यांचे रुंदीकरण  आणि स्वच्छतेचे काम एमएमबी अर्थात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून मात्र कूर्म गतीने सुरू आहे.

इंधनात बचत होणार     मुंंबई-नवी मुंंबईसह कल्याण- डोंबिवली, ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर-वसई आणि नजीकचे उरण, अलिबाग व कोकणातील दाभोळ, वेलदूर, आंबवणेसारख्या बंंदरांवरही चाकरमान्यांना कॅटमरान, स्पीड बोटींसह रो-रो पॅक्सने ये-जा करता येणार आहे.      सध्या भाऊचा धक्का ते रेवस, करंजा, मोरा, धरमतर मार्गावर प्रवासी जलवाहतूक सुरू आहे. यामुळे प्रवासाचे अंतर जवळ येऊन इंधनासह वेळेचीही बचत होऊन प्रदूषण आणि अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे.

प्रवासी वाहतुकीसाठी सुचविलेले नऊ मार्गभाईंदर ते घोडबंंदरडोंबिवली ते भाईंदरडोंबिवली ते काल्हेरकाल्हेर ते भाईंदरकोलशेत ते भाईंदरनारंंगी ते खरवडेश्वरीबेलापूर ते गेट वे ऑफ इंडियारेडिओ क्लब ते बेलापूर/मांडवा/ मोरा-उरणरो-रो पॅक्स मालवाहतुकीसाठी सुचविलेले मार्गभाईंदर ते वसईमार्वे ते मनोरीरेवस ते करंजानारंंगी ते खरवडेश्वरी वसई ते घोडबंदरबोरिवली ते गोराई वेलदूर ते दाभोळडीसीटी ते काशीदतोराडी ते आंबवणेडीसीटी ते नेरूळ

संबंधित परवानगीची मुदत संपल्याने आता पुन्हा सीआरझेड प्राधिकरणाने एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीत पुढील तीन वर्षे अर्थात १७ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ  दिली आहे. यामुळे मेरिटाइम बोर्डास मोठा दिलासा मिळाला आहे. मुंंबई महानगर प्रदेशातील सात महानगरे एकमेकांना प्रवासी जलवाहतूक आणि मालवाहतुकीने जोडली जाणार असल्याने सध्याचा रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवरील मोठा ताण दूर होणार आहे. शिवाय प्रवासी आपल्या कार/ दुचाकी रो-रो पॅक्स सेवेद्वारे इच्छितस्थळी नेऊन त्या त्या ठिकाणी भाड्याचे वाहन न घेता स्वत:च्या वाहनांनी फिरून पर्यटनाचा आनंद लुटू शकणार आहेत. यामुळे पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.

खाड्या आणि नदी मार्गांची खोली वाढवून रुंदीकरणअरबी समुद्रातील ठाणे खाडी, वसई खाडीसह, बाणकोट, धरमतर, नागाव, उलवा, दादर- रावे, राजपुरी, आजरा, दाभोळ, जयगड, पालशेत, कालबादेवी, मालगुंड, राजापूर, वाघोटन हे खाडी मार्ग आणि उल्हासनदी, वैतरणा नदी, तानसा नदी, काळ, कुंडलिका नदी मार्गाचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार आहे.